औरंगाबादेत आज १६६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, ३ हजार १४९ रूग्णांवर उपचार सुरू

0
59

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यात औरंगाबाद मनपा हद्दीतील ९९ तर ग्रामीण भागातील ६७ रुग्णांचा समावेश आहे. या रूग्णांमध्ये ९२ पुरूष तर ७४ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७ हजार ३०० कोरोनाबाधित आढळले असून  त्यापैकी ३८२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ३२७ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार १४९ जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या १ हजार ३ स्वॅबपैकी आज १६६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले.

आज सकाळी औरंगाबाद मनपा हद्दीत ९९ नवीन रूग्ण आढळले. त्यात अमृतसाई प्लाजा २१, पद्मपुरा १४, एन अकरा, हडको ५, शिवशंकर कॉलनी ४, खोकडपुरा ३, जालान नगर ३, जाधववाडी ३, राजेसंभाजी नगर ३, चिकलठाणा २, मारोती नगर २, टीव्ही सेंटर २, हर्सूल जटवाडा रोड १, मिल कॉर्नर १, सिडको १, भगतसिंग नगर १, एन सहा सिडको १, एन बारा, हडको, टीव्ही सेंटर १, एकनाथ नगर १, शहागंज १, शिवाजी नगर २, कटकट गेट १, वसंत विहार १, हुसेन कॉलनी १, देवळाई १, सातारागाव १, नंदनवन कॉलनी १, स्वराज नगर १, उस्मानपुरा १, जवाहर कॉलनी १, पिसादेवी १, समर्थ नगर १, एन सात, आयोध्या नगर १, हर्सूल १, पैठण गेट १, पवन नगर १, जाफर गेट १, दशमेश नगर १, गजानन नगर २, रमा नगर १, सुरेवाडी १, ज्योती नगर १, छावणी २, राम नगर १, फुले चौक, औरंगपुरा १, एसटी कॉलनी १ रूग्ण आहेत.

ग्रामीण भागातही ६७ नवीन रूग्ण आढळले. त्यात अजिंठा २०, दत्त नगर, रांजणगाव २, रांजणगाव २, कराडी मोहल्ला, पैठण १, वरूड काझी १, सारोळा, कन्नड १, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, वडगाव कोल्हाटी १, सिडको बजाज नगर १, वडगाव साईनगर, बजाज नगर १, छत्रपती नगर, वडगाव २, वडगाव, बजाज नगर १, विश्व विजय सोसायटी, बजाज नगर १, एकदंत सोसायटी, बजाज नगर १, आनंद जनसागर, बजाज नगर १, वळदगाव १, सुवास्तू सोसायटी, बजाज नगर १, सासवडे मेडिकल जवळ, बजाज नगर ६, तनवाणी शाळेजवळ,मुंडे चौक, बजाज नगर ४, साराकिर्ती, बजाज नगर २, गणपती मंदिरासमोर, बजाज नगर २, पाटोदा, बजाज नगर २, वडगाव कोल्हाटी, संगम नगर, बजाज नगर २, अन्य १, बालाजी सोसायटी, बजाज नगर ४, लक्ष्मी नगर, पैठण ४, शिवशक्ती कॉलनी, वैजापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा