औरंगाबादेत १७ रूग्ण वाढले, एकूण कोरोना बाधितांची संख्या ३७३

0
107

औरंगाबाद : औरंगाबादेतील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत आज आणखी १७ नवीन रूग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३७३ वर पोहोचली आहे.

 सकाळच्या सत्र प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार, पुंडलिक नगरमध्ये ५, हमालवाडीत ४, कटकट गेट परिसरात ३,  रेल्वे स्टेशन परिसरात १, जयभीम नगरात २, किलेअर्कमध्ये २ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण नव्याने आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून देण्यात आली. दरम्यान, काल वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाज नगरमधील इंद्रप्रस्थ कॉलनीत एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर त्या भागात कडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आज सकाळपासूनच दिसून येत आहे.


वाळूज परिसरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर कडक तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे वाहनांच्या अशा लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा