लॉकडाऊन काळात राज्यात पोलिसांवर तब्बल १७३ हल्ले, ६५९ जणांना अटक

0
38
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत असलेले कोरोनायोद्धे म्हणजेच पोलिसांवर लॉकडाऊन घोषित झाल्यापासून राज्यात आजवर तब्बल  १७३ हल्ले झाले आहेत.

२२ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन घोषित झाला. तेव्हापासून २ मेपर्यंत राज्यात विविध ठिकाणी पोलिसांवर १७३ हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी  ६५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याच कालावधी राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ नुसार ९१ हजार २१७ गुन्हे दाखल झाले असून १८ हजार ४८ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी २५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीनेदेण्यात आली आहे.

३१० पोलिस कर्मचारी कोरोनाग्रस्त, तिघांचा मृत्यूः  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी-कर्मचारीही २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना ५१ पोलीस अधिकारी व ३१० पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी २३ पोलीस अधिकारी व २६ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या २८ पोलीस अधिकारी व २८१ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा