महाराष्ट्रात १८७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, १७ मृत्यू, एकूण बाधितांची संख्या १७६१ वर

0
154

मुंबई राज्यात शनिवारी १८७ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण रूग्णसंख्या १७६१ वर पोहोचली आहे. १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्याही १२७ वर पोहोचली आहे. दुसरीकडे, कोरोनाबाधित २०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ हजार ७७१ नमुन्यांपैकी ३४ हजार ९४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर १७६१  जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २०८ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार ८०० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४९६४  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

शनिवारी राज्यात १७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईचे १२ तर पुणे येथील २ , सातारा, धुळे आणि मालेगाव येथील प्रत्येकी १ आहे. शनिवारी झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ६ महिला आहेत. या १७ मृत्यूंपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत. ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर तिघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या १७ पैकी १६ रुग्णांमध्ये (९४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी दोघांमध्ये क्षयरोग हा आजारही होता.

जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशीलः
मुंबई महानगरपालिकाः ११४६ (मृत्यूः ७६)
ठाणे जिल्हाः ०६
ठाणे मनपाः २९ (मृत्यूः०३)
नवी मुंबई मनपाः ३६ (मृत्यूः ०२)
कल्याण डोंबवली मनपाः ३५ (मृत्यूः ०२)
उल्हासनगर मनपाः ०१
भिवंडी निजामपूर मनपाः ००
मीरा भाईंदर मनपाः ३६ (मृत्यूः ०१)
पालघरः ०४ (मृत्यूः ०१)
वसई विरार मनपाः १४ (मृत्यूः ०३)
रायगडः ००
पनवेल मनपाः ०७ (मृत्यूः ०१)
ठाणे मंडळ एकूणः १३१४ (मृत्यूः ८९)
नाशिक जिल्हाः ०२
नाशिक मनपाः ०१
मालेगाव मनपाः ११ (मृत्यूः ०२)
अहमदनगर जिल्हाः १०
अहमदनगर मनपाः १६
धुळे जिल्हाः ०१ (मृत्यूः ०१)
धुळे मनपा ००
जळगाव जिल्हाः ०१
जळगाव मनपाः ०१ (मृत्यूः ०१)
नंदूरबारः ००
नाशिक मंडळ एकूणः ४३ (मृत्यूः ०४)
पुणे जिल्हाः ०७
पुणे मनपाः २२८ (मृत्यूः २७)
पिंपरी-चिंचवड मनपाः २२
सोलापूर जिल्हाः ००
सोलापूर मनपाः ००
साताराः ०६ (मृत्यूः ०२)
पुणे मंडळ एकूणः २६३ (मृत्यूः२९)
कोल्हापूर जिल्हाः ०१
कोल्हापूर मनपाः ०५
सांगली जिल्हाः २६
सांगली मि., कु., मनपाः ००
सिंधुदुर्गः ०१
रत्नागिरीः ०५ (मृत्यूः ०१)
कोल्हापूर मंडळ एकूणः ३८ (मृत्यूः ०१)
औरंगाबाद जिल्हाः ०३
औरंगाबाद मनपाः १६ (मृत्यूः ०१)
जालनाः ०१
हिंगोलीः ०१  
परभणीः ००
परभणी मनपाः ००
औरंगाबाद मंडळ एकूणः २१ (मृत्यूः ०१)
लातूर जिल्हाः ००
लातूर मनपाः ०८
उस्मानाबादः ०४
बीडः ०१
नांदेड जिल्हाः ००
नांदेड मनपाः ००
लातूर मंडळ एकूणः १३
अकोला जिल्हाः ००
अकोला मनपाः १२
अमरावती जिल्हाः ००
अमरावती मनपाः ०४ (मृत्यूः ०१)
यवतमाळः ०४
बुलढाणाः १३ (मृत्यूः ०१)
वाशिमः ०१
अकोला मंडळ एकूणः ३४ (मृत्यूः ०२)
नागपूर जिल्हाः ००
नागपूर मनपाः २५ (मृत्यूः ०१)
वर्धाः ००
भंडाराः ००
गोंदियाः ०१
चंद्रपूर जिल्हाः ००
चंद्रपूर मनपाः ००
गडचिरोलीः ००
नागपूर मंडळ एकूणः २६ (मृत्यूः ०१)
इतर राज्येः ०९
एकूणः १७६१           मृत्यूः १२७

केंद्राचे पथक पुण्यात दाखलः शुक्रवारपासून डॉ. पी. के. सेन अतिरिक्त महासंचालक, भारत सरकार यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय शीघ्र प्रतिसाद पथक पुणे येथे कोविड १९ प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेत आहे. या पथकामध्ये डॉ. सेन यांच्या सोबत डॉ. रोहित बन्सल, वैद्यकीय तज्ञ आणि डॉ. सौरभ मित्रा (भूलतज्ज्ञ) यांचाही समावेश आहे.या पथकाने मागील २ दिवसात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, नायडू रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध तसेच वाय. सी. एम. रुग्णालय,पिंपरी येथे भेट दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा