औरंगाबादेत आज दुपारपर्यंत १९६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ, एकूण संख्या साडेसहा हजारांजवळ!

0
156

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारपर्यंत १९६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये ११० पुरूष, ८६ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ६ हजार ४६० कोरोनाबाधित आढळले असून ३ हजार १२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २८७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३हजार ४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दुपारपर्यंत आढळलेल्या रूग्णांत औरंगाबाद मनपा हद्दीत १५२ रूग्ण आढळले आहेत. त्यात गजानन कॉलनी १०, विठ्ठल नगर ११, मिसारवाडी ८, जय भवानी नगर ५,  गुलमोहर कॉलनी ५, बाबू नगर ५, अरिहंत नगर ५, घाटी परिसर ४, सिडको ४, कांचनवाडी ४, शिवाजी नगर ३, हर्सूल ३, नवाबपुरा ३, एन अकरा, सिडको ३, पद्मपुरा, कोकणावाडी ३, पडेगाव ३, एन सात, सिडको ३, मयूर पार्क ३, उस्मानपुरा ३, बजरंग चौक ३, पुंडलिक नगर २, रेल्वे स्टेशन परिसर २, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी २, उल्कानगरी, गारखेडा २, बंबाट नगर २, देवळाई परिसर २, छावणी २, नवजीवन कॉलनी २, तारक कॉलनी २, गादिया विहार २, समता नगर २, क्रांती चौक २, खोकडपुरा २,रघुवीर नगर १, आलमगीर कॉलनी १, शाह बाजार १, मुकुंदवाडी १, आंबेडकर नगर १, लोटा कारंजा १, जाधववाडी १, सहकार नगर १, हर्ष नगर १, एन बारा १, हडको १, एमजीएम परिसर १, बुड्डी लेन १, उस्मानपुरा १, राम नगर १, मिलिंद नगर १, शिवेश्श्वर कॉलनी, मयूर पार्क १, आझाद कॉलनी १, एसटी कॉलनी १, गारखेडा १, एन दोन सिडको १, माता मंदिर, एन सहा १, सेंट्रल नाका १, मोमीनपुरा १, अंबिका नगर १, म्हाडा कॉलनी १,दशमेश नगर १, आर्यन नगर १, गजानन नगर १, एमआयडीसी चिकलठाणा १, अन्य १, एन सहा सिडको १, आदर्श कॉलनी १, जरीपुरा १, न्यू हनुमान नगर १ या भागातील रूग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातही दुपारपर्यंत ४४ रूग्ण आढळून आले आहेत. त्यात वाळूज महानगर सिडको, बजाज नगर ५, सारा परिवर्तन सावंगी ३, जीवनधारा सोसायटी, बजाज नगर ३, द्वारकानगरी, बजाज नगर २, प्रताप चौक, बजाज नगर २, कृष्णकोयना सोसायटी, बजाज नगर २, वडगाव, बजाज नगर २, रांजणगाव,गंगापूर २, गंगापूर, वाळूज २,रांजणगाव २, गोंदेगाव १, डोंगरगाव १, जिजामाता सोसायटी, वडगाव १, सिडको महानगर १, सपना मार्केट जवळ, बजाज नगर १, वडगाव कोल्हाटी १, इंड्रोस सोसायटी, बजाज नगर १, विश्वविजय सोसायटी, बजाज नगर १, धनश्री सोसायटी, बजाज नगर १, सायली सोसायटी, बजाज नगर १, श्रीराम सोसायटी, बजाज नगर १, शनेश्वर सोसायटी, बजाज नगर १, वृंदावन हॉटेल जवळ, बजाज नगर १, साजापूर १, कुंभारवाडा, पैठण १ फत्ते मैदान, फुलंब्री १, दौलताबाद १, अरब गल्ली, गंगापूर १, भेंडाळा, गंगापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा