औरंगाबादेत दिवसभरात २०४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, ४०९ रूग्णांना डिस्चार्ज!

0
32

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात २०४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजवर आढळलेल्या रूग्णांची संख्या १४ हजार ३२७ झाली आहे. आतापर्यंत ४७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार २४८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आज महानगर पालिका हद्दीतील ३७२ आणि ग्रमाणी भागातील ३७ कोरोना बाधित रूग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत १० हजार ६०१ कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

 जिल्ह्यात आज सकाळी ६९, दुपारी दोन रूग्ण आढळले होते. सायंकाळनंतर आणखी १३३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटिजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर २०, मोबाइल स्वॅब कलेक्शन पथकास ३४ आणि ग्रामीण भागात ७५ रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

महापालिका क्षेत्रात ४८ रूग्ण आढळले. त्यात पद्मपुरा ८, पुंडलिक नगर ५, म्हाडा कॉलनी ३, बन्सीलाल नगर ३, मिटमिटा ३, बालाजी नगर २, मिलिट्री हॉस्पीटल परिसर, छावणी २, शिवाजी नगर २, एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर १, विष्णू नगर १, संजय नगर, बायजीपुरा १, चिकलठाणा १, छावणी १, एनएच हॉस्टेल, घाटी परिसर १, उस्मानपुरा १, बजाज नगर १, सावित्री नगर, चिकलठाणा १, जवाहर कॉलनी १, सिंधी कॉलनी १, रमा नगर १, शिल्प नगर १, छत्रपती नगर १, जहागीरदार कॉलनी १, विजय नगर, शिवनेरी कॉलनी, गारखेडा २, सदाशिव नगर, सिडको १, छावणी १, अन्य १ रूग्ण आहेत.

ग्रामीण भागात १०२ रूग्ण आढळले. त्यात सोयगाव २१, वैजापूर १३, औरंगाबाद १२, पैठण ११, सिल्लोड ९, गंगापूर ७, फुलंब्री १, खुलताबाद १, ऋषीकेश नगर, रांजणगाव १, अजिंठा १, वांजोळ, सिल्लोड १, रांजणगाव १,पानवडोद, सिल्लोड १, मारोती नगर, गंगापूर १, गंगापूर १, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, आकाश विहार, बजाज नगर १, पारिजात हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, देवदूत हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर २, पाटील कॉम्प्लेक्स परिसर, बजाज नगर १, स्वामी समर्थ नगर, बजाज नगर १, बकवाल नगर, नायगाव १, सावता नगर, रांजणगाव, वाळूज १, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, लेन नगर, वाळूज २, सोनवाडी नगर, कन्नड १, दाभाडी, कन्नड १, हतनूर, कन्नड १, बाजारसावंगी, खुलताबाद २, पाचोड, पैठण १, जोगेश्वरी, रांजणगाव १, सोनार गल्ली, गंगापूर १, नारेगाव रोड, वरूड काझी १ रूग्ण आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा