राज्यात कोरोनाचे आज २ हजार ३६२ नवीन रूग्ण, सध्या ३७ हजार ५३४ रूग्णांवर उपचार सुरू

0
58

मुंबई: राज्यात आज २ हजार ३६१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७० हजार ०१३ झाली आहे. आज राज्यात ७६ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे राज्यातील एकूण मृतांची संख्या २ हजार ३६२ झाली आहे. राज्यात आज ७७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यभरात आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या ३० हजार १०८ झाली आहे. सध्या राज्यात ३७ हजार ५३४  रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ४ लाख ७१ हजार ५७३ नमुन्यांपैकी ७० हजार ०१३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६७ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३६ हजार १८९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत ५२, पुण्यात ९ मृत्यूः राज्यात आज ७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत ५२, ठाण्यात ५, नवी मुंबईत ९,  कल्याण डोंबिवलीत ४, मालेगावमध्ये ६, पुण्यात ९, सोलापुरात २, उस्मानाबादेत १ आणि यवतमाळमध्ये १ रूग्णाचा मृत्यू झाला. या मृत्यूंपैकी ४५ पुरुष तर ३१ महिला आहेत. आजच्या ७६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३७ रुग्ण आहेत तर ३६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ जण ४० वर्षांखालील आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा