औरंगाबादेत आज आढळले २४ नवीन रूग्ण, एकूण रूग्णसंख्या झाली ६७७

0
189
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबादेतील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत आज पुन्हा २४ नवीन रूग्णांची भर पडली. त्यामुळे औरंगाबादेतील एकूण कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ६७७ झाली आहे. आतापर्यंत १५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज सकाळाच्या सत्रात जाहीर करण्यात आलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये नंदनवन कॉलनीतील ४, हुसेन कॉलनीतील ३, संजय नगरमधील २, पुंडलिक नगरमधील २ आणि राम नगर, भावसिंगपुरा, पदमपुरा, गांधी नर, जयभवानी नगर, विजय नगर, सातारा परिसर, सिडको एन-८, गारखेडा, भडकल गेट, अरूणोदय कॉलनी, रहेमानिया कॉलनी या भागातील प्रत्येकी १ रूग्णाचा समावेश आहे. विशेष म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय म्हणजेच घाटी कॅम्पसमधील एका पॉझिटिव्ह रूग्णाचाही यात समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा