औरंगाबादेत दिवसभरात २४१ कोरोना बाधित रूग्णांची भर, २४ तासांत ९ जणांचा मृत्यू

0
82

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल २४१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. सकाळच्या सत्रात २०८ रूग्ण आढळले होते. सायंकाळपर्यंत त्यात आणखी ३३ रूग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५ हजार ७ झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत ९ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्याही २४७ झाली आहे. जिल्ह्यात आजवर आढळलेल्या रूग्णांपैकी २ हजार ४४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ हजार ३१४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय  म्हणजेच घाटीत २७ जून रोजी  औरंगाबादेतील सिटी चौक परिसरातील ७५ वर्षीय पुरूष, खुल्ताबाद येथील ६० वर्षीय स्त्री, सादात नगरातील ५९ वर्षीय पुरूष, वैजापुरातील ६५ वर्षीय स्त्री, औरंगाबादेतील रामकृष्ण नगरातील ७२ वर्षीय स्त्री, २८ जून रोजी वैजापुरातील ६० वर्षीय स्त्री, औरंगाबादेतील एन सात सिडकोतील ७० वर्षीय पुरूष आणि क्रांती चौक, सिल्लेखाना येथील ६० वर्षीय स्त्री या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका खासगी रुग्णालयात औरंगाबादेतील एन बारा टीव्ही सेंटर येथील ६० वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

घाटीमध्ये आतापर्यंत एकूण १९० कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी १८६ कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील १८६,  औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ५०, जिल्हा सामान्य रूग्णालयात ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण २४७ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

दरम्यान दुपारनंतर औरंगाबाद मनपा हद्दीत सादात नगर १, एन चार सिडको २, सिंधी कॉलनी १, जय भवानी नगर, एन चार सिडको १, एन चार समृद्धी नगर, सिडको १, जय भवानी नगर, एन चार सिडको २, एन सात, सिडको पोलिस स्टेशन जवळ, सिडको ३,  एन चार सिडको १, सराफा रोड ४,  गारखेडागाव १, सातारा परिसर १, एन नऊ १, मुकुंदवाडी, रोहिदास नगर १, लोटा कारंजा १, साई नगर, गारखेडा १, द्वारकापुरी, उस्मानपुरा १, न्यू मोंढा, गोकूळ नगर १, श्रीगणेश रेसिडन्सी, चिकलठाणा २, शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी १, बँक कॉलनी, गारखेडा २ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागातील चिंचबन कॉलनी, बजाज नगर १ साई श्रद्धा पार्क, बजाज नगर २, शिवाजी नगर, गंगापूर १ या भागात कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा