औरंगाबादेत दिवसभरात २४८ कोरोना बाधित रूग्णांची भर, तिघांचा मृत्यू

0
169
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात २४८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता ८ हजार ४६४ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत ३५४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ४९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे आज २२७ रूग्णांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यात औरंगाबाद महापालिका हद्दीतील १७८ आणि ग्रामीण भागातील ४९ रूग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ६१ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात आढळलेल्या २४८ रूग्णांत औरंगाबाद महापालिका हद्दीतील १८८ रूग्ण आहेत तर ६० रूग्ण ग्रामीण भागातील आहेत. आज दुपारनंतर औरंगाबादेत ११८ रूग्णांची वाढ झाली आहे. त्यात १०६ रुग्णांची अँटिजेन टेस्टद्वारे केलेली तपासणी पॉझिटिव्ह आली आहे.

हेही वाचाः औरंगाबादेत स्वॅब तपासणीच्या दुसऱ्या टप्प्यात आढळले ६६ रूग्ण, आज दुपारपर्यंत संख्या १३० वर

औरंगाबादेत दररोज आढळणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या आज तीनपटीने घटली, सकाळी ६४ रूग्ण

 दुपारनंतर मनपा हद्दीत ९३ रूग्ण आढळले. त्यात सिडको एन-सात आयोध्या नगरमधील २५, सिडको एन-बारामधील १७, केसरसिंगपुरा ११, मसनतपूर ११, गजानन कॉलनी ६,  राजाबाजार ६, एन-अकरा ३, इटखेडा ३,  न्यू गणेश नगर ३, जाधववाडी २, रेल्वे स्टेशन परिसर २, उमाजी कॉलनी, बन्सीलाल नगर १, गजानन नगर १, कांचनवाडी १,  शाह बाजार १ रूग्ण आढळून आला आहे. विविध चेक पॉइंटवर आज २४ रूग्ण आढळले. त्यात कांचनवाडी चेक पॉइंटवर ८, हर्सूल ४, नगर नाका ६, दौलताबाद १, चिकलठाणा चेक पॉइंटवर ५ रुग्ण आढळले. तर ग्रामीण भागात गोंगरगाव, सिल्लोड येथे १ रूग्ण आढळला.

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यूः शहरातील तीन विविध खासगी रुग्णालयात बीड बायपास रोडवरील अबरार कॉलनीतील ४८ वर्षीय पुरूष, राम नगरातील ७० वर्षीय स्त्री, न्यू श्रेय नगर येथील ७० वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा