औरंगाबादेत आज दिवसभरात २४९ नवे रूग्ण, ११५ जण कोरोनामुक्त; चोवीस तासांत १४ रूग्णांचा मृत्यू

0
75
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात २४९ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यात औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील १७४, आणि ग्रामीण भागातील ७५ रुग्ण असून १३९ पुरूष, ११० महिलांचा समावेश आहे. आज आढळलेल्या या रूग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या  ६ हजार ५१३ झाली आहे. दुसरीकडे आज ११५ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३ हजार २४१ झाली आहे. सध्या २ हजार ९७२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत शहरात १४ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ९ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ३०० वर पोहोचली आहे.

आज दुपारपर्यंत जिल्ह्यात १९६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते. सायंकाळनंतर त्यात ५३ रुग्णांची भर पडली. त्यात २९ पुरूष आणि २४ महिला रूग्णांचा समावेश आहे. त्यामुळे दिवसभरात आढळलेल्या कोरोना बाधित रूग्णांची संख्या २४९ वर पोहोचली आहे.

हेही वाचाः औरंगाबादेत आज दुपारपर्यंत १९६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ, एकूण संख्या साडेसहा हजारांजवळ!

सायंकाळनंतर औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण २२ आढळून आले आहेत. त्यात हडको २, गजानन कॉलनी, गारखेडा परिसर १, अविष्कार कॉलनी १, प्रताप चौक १,  जाधवमंडी २, मोतीवाला नगर १,  राजीव गांधी नगर, सिडको १, नक्षत्रवाडी १, सातारा परिसर १ सुरळवाडी, हर्सूल १, संभाजी कॉलनी १, एन सहा सिडको १, श्रद्धा कॉलनी १,  सावरकर कॉलनी, बजाज नगर २, एकनाथ नगर १,  शिवशंकर कॉलनी १, भोईवाडा १, बायजीपुरा १, नारळीबाग १ या रूग्णांचा समावेश आहे.

 सायंकाळनंतर ग्रामीण भागात आढळलेल्या रूग्णांची संख्या ३१ आहे. त्यात पोलिस स्टेशन परिसर,कन्नड १, नागापूर, कन्नड २, कन्नड १,  टिळक नगर, कन्नड ५, दिग्विजय सो., बजाज नगर १, वाळूज १, अजिंठा ८,  दर्गाबेस, वैजापूर १०, शक्कर मोहल्ला, लासूर स्टेशन १, साऊथ सिटी १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

घाटीत ११, खासगीत ३ कोरोनाबाधितांचा मृत्यूः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घाटी ३ जुलै रोजी जय भवानी नगर, मुकुंदवाडीतील ५५ वर्षीय महिला, नक्षत्रवाडीतील हिंदुस्तान आवास येथील ७८ वर्षीय पुरुष, नारळीबाग येथील ७८ वर्षीय महिला, शाही नगर, गारखेडा येथील ६५ वर्षीय महिला,  फुले नगर, उस्मानपुऱ्यातील ५२ वर्षीय महिला,  दालावाडी, पैठण गेट येथील ५५ वर्षीय पुरुष,  अजिंठा, सिल्लोड येथील ७८ वर्षीय महिला, आलमगीर कॉलनीतील ५२ वर्षीय महिला, ०४ जुलै रोजी बजाज नगरातील ५५ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील परतूर येथील ५० वर्षीय महिला, उस्मानपुरा, एकनाथ नगर येथील ६४ वर्षीय महिला या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत २३३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात २२७ कोरोनाबाधित वास्तव्यास होते.

खासगी रूग्णालयांत आजवर ७१ मृत्यूः शहरातील खासगी रुग्णालयात तीन जुलै रोजी नेहरू नगर येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा, अन्य एका खासगी रुग्णालयात रोशन गेट येथील ४१ वर्षीय महिला आणि चार जुलै रोजी सातारा परिसरातील ३७ वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत घाटीत २२७, विविध खासगी दवाखान्यांमध्ये ७१, जिल्हा सामान्य रुग्णालयात ०२ अशा एकूण ३०० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा