औरंगाबादेतील कोरोना बाधितांची संख्या ९००, दुपारनंतर आढळले २८ नवीन रूग्ण

0
130
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात आज दुपारी २८ कोरोनाबाधितांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९०० झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

दुपारी आढळलेल्या रूग्णांमध्ये बायजीपुरा (१०) कैलास नगर (१), चाऊस कॉलनी (२),  मकसूद कॉलनी (२), हुसेन कॉलनी (४), जाधववाडी (१), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.३ (१),  एन-६ संभाजी कॉलनी, सिडको (१),  कटकट गेट (१), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (२),  लेबर कॉलनी (१), जटवाडा (१),  राहुल नगर (१)  आणि  जलाल कॉलनी (१) या भागातील कोरोना बाधित आहेत. यामध्ये १६ पुरुष आणि १२ महिला रुग्णांचा समावेश असल्याचेही त्यांनी कळवले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा