औरंगाबादेत २८ कोरोना रूग्ण वाढले, एकूण संख्या ३४९; वाळूज एमआयडीसी भागात पहिला पॉझिटिव्ह

0
147
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण २७ आणि ग्रामीण भागातील एक कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित ३४९  झाले आहेत. विशेष म्हणजे वाळूज एमआयडीसी भागात असलेल्या बजाज नगर परिसरातील इंद्रप्रस्थ कॉलनीत एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे. एमआयडीसी परिसरातील हा पहिलाच रूग्ण आहे.

नव्याने आढळून आलेल्या रूग्णांत जयभीम नगरमध्ये ५, कबाडीपुऱ्यात ५, दत्तनगर- कैलासनगरमध्ये ४, बायजीपुऱ्यात ४, संजय नगर-मुकुंदवाडीत ३ पुंडलिक नगरमध्ये ३ आणि बेगमपुरा, रेल्वे स्टेशन परिसर, कबीर नगर- उस्मानपुरा, सातारा रोड या भागात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागातील इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर, एमआयडीसी येथील एका महिला रुग्णांचा समावेश आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने कळवण्यात आले आहे.

सर्वाधिक रुग्ण संजयनगरमध्येः आजवर आढळलेल्या रूग्णांत सर्वाधिक ६० रुग्ण मुकुंदवाडी भागातील संजयनगरमध्ये तर त्या खालोखाल ५१ रुग्ण जयभीम नगरात आढळून आले आहेत. आजवर सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेले परिसर असेः

संजय नगर- मुकुंदवाडीः ६३
जयभीम नगरः ५६

नूर कॉलनीः ३८
किले अर्कः २९
आसेफिया कॉलनीः २७
समतानगरः १०

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा