२८३ नवीन रुग्णांची वाढ, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ४,४८३ वर

0
184

मुंबईः राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज सकाळी ११ वाजेपर्यंत २८३ नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४,४८३ वर पोहोचली आहे. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या पैकी १८७ रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत.

नव्याने आढळून आलेल्या २८३ रूग्णांमध्ये मुंबईतील १८७, नवी मुंबईतील ९, पनवेलमधील ६, पिंपरी-चिंचवडमधील ९, ठाण्यातील २१, वसई-विरारमधील २२, कल्याण- डोंबिवलीमधील १६, भिवंडीतील १, मीरा- भाईंदरमधील ७, नागपुरातील१, रायगडमधील २, साताऱ्यातील १ आणि सोलापुरातील एका रूग्णाचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा