महाराष्ट्रात कोरोनाः २ हजार ९३३ नवीन कोरोना बाधित रूग्ण, १२३ जणांचा मृत्यू

0
123

मुंबई: राज्यात आज २ हजार ९३३ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून तब्बल १२३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कालही १२२ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ७७ हजार ७९३ वर पोहोचली. त्यापैकी ३३ हजार ६८१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून सध्या ४१ हजार ३९३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.  आजही १,३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज १२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्यातील एकूण मृतांची संख्या २ हजार ७१० झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांमध्ये मुंबई ४८, ठाणे ८, नवी मुंबई ६, वसई विरार १, पालघर १, पनवेल १,  धुळे १, जळगाव २१, नाशिक ३, पुणे ९, सोलापूर ७, कोल्हापूर २, औरंगाबाद ५, जालना १, परभणी २, लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १, वाशिम २, यवतमाळ १ येथील रूग्ण आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ८५ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू  ३० मे ते १ जून या कालावधीतील आहेत.

५ लाख ६० हजार लोक होम क्वारंटाइनः सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाइनमध्ये  आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये ७३ हजार ०४९ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतील रूग्णसंख्या ४४ हजार ९३१, एकूण १ हजार ६४६५ मृत्यू: मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक कोरोना बाधित रूग्णांची संख्या आहे. आजवर मुंबईत ४४,९३१ रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १हजार ४६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १८ हजार ०९६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या २५ हजार ३६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्या पाठोपाठ ठाण्यात ११ हजार ४२० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून २५४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार १७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. ठाण्यात सध्या ६ हजार ९८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा