राज्यात आज २ हजार ९४० नवे कोरोना बाधित रूग्ण, ९९ मृत्यू; ३ हजार १६९ सक्रीय कंटेनमेंट झोन

0
226
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई :  राज्यात आज २ हजार ९४० नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ६५ हजार १६८ झाली आहे. तर ९९ रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या २ हजार १९७ झाली आहे. राज्यात आतापर्यंत २८ हजार ८१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात सध्या ३ हजार १६९ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत

राज्यात ९९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात मुंबईतील ५४, ठाणे ६, वसई-विरार ७, नवी मुंबई २, रायगड ३, पनवेल ७, कल्याण डोंबिवली २, जळगाव ३, पुणे ६, सोलापूर ६, नागपूरमधील १ रुग्णाचा समावेश आहे. मृतांपैकी ६२ पुरुष तर ३७ महिला आहेत. या ९९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८  रुग्ण आहेत तर ४९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २ जण ४० वर्षांखालील आहे.

हेही वाचाः कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवला, अन्य भाग टप्प्याटप्प्याने खुला होणार

१ हजार ८४ जणांना घरी सोडलेः राज्यात आज १ हजार ८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  २८ हजार ८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

हेही वाचाः सर्वाधिक वेगाने नवीन कोरोना रूग्ण वाढीत भारत जगात दुसऱ्या,तर पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर!

रूग्ण दुपटीचा वेग १७.५ दिवसांवरः राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.३ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १७.१ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.०७ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.

४ लाख ३३ हजारांहून अधिक चाचण्याः राज्यात आजपर्यंत ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६५ हजार १६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४३ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७७ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रतिदशलक्ष ३३४९ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २५२३ एवढे आहे.

हेही वाचाः त्रास द्याल तर सायनाइड घेऊन आत्महत्याः केंद्रीय मंत्री दानवेंना जावई हर्षवर्धन जाधवांची धमकी

साडेपाच लाख लोक होम क्वारंटाइनः सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ६६० लोक होम क्वारंटाइनमध्ये  आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ६८१ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ४२० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या ३१६९ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा