औरंगाबादः १५ नव्या रूग्णांसह कोरोनाग्रस्तांची संख्या २९७; एकूण रूग्णांत तब्बल ४४ टक्के महिला

0
90
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: सोमवारी औरंगाबाद शहराच्या विविध भागातील १५ कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २९७ झाली आहे.एकूण कोरोना बाधित रूग्णात ५६ टक्के पुरूष आणि ४४ टक्के महिला रूग्ण आहेत.

सोमवारी संजयनगरमध्ये ४, जयभीम नगरमध्ये ३, किलेअर्क व पुंडलिकनगरमध्ये प्रत्येकी २ सावित्रिनीगर( चिकलठाणा), देवळाई, नंदनवन कॉलनी, एन-११ हडकोतील सुदर्शनगरात प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) कोविड डेडिकेटेड रुग्णालयात एकूण १९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १६ रुग्णांची प्रकृती सामान्य आहे. तीन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तर घाटीतून ११ पॉझिटिव्ह रुग्णांना किलेअर्क येथील कोविड केअर सेंटर येथे संदर्भीत केले आहे. सध्या घाटीत ३७ कोविड निगेटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन कोविड रुग्ण बरे झाल्याने त्यांना उपचारांती सुटी दिली आहे. घाटीत उपचार घेत असलेल्या सिटी चौकातील ६५ वर्षीय पुरूष रुग्ण, टीव्ही सेंटर येथील २७ वर्षीय स्त्री रुग्ण यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आलेला आहे. याशिवाय मनपा हद्दीतील चार जणांचाही कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९७ झाल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळविले आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयात आज १९ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह, पाच रुग्णांचे निगेटीव्ह आले आहेत. १२ अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर सध्या मिनी घाटीमध्ये  १२४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याचेही कळविण्यात आलेले आहे.

२१ ते ३० वयोगटातील सर्वाधिक रूग्णः कोरोनाबाधित २९७ रुग्णांपैकी सर्वाधिक ६६ रूग्ण रुग्ण २१ ते ३० वयोगटातील. त्यापाठोपाठ ३१ ते ४० वयोगटातील ६४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. सर्वात जास्त वय असलेल्या ८० वर्षावरील एका रुग्णाचा समावेश आहे. वय वर्षे एक ते १० वयोगटातील २४ रुग्ण आहेत. ११ ते २० वयोगटातील ५२ , ४१ ते ५० वयोगटातील ३५,  ५१ ते ६० वयोगटातील २६,  ६१ ते ७० वयोगटातील २१ , ७१ ते ८० वयोगटातील आठ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. यामध्ये १६६ पुरूष रुग्ण, १३१ महिला रुग्ण आहेत.

मृत्यू झालेल्यांचा वयोगट असाः  दहा मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वयामध्ये ४१ ते ५० वयोगटातील एका रुग्णाचा समावेश आहे. ५१ ते ६० वर्षातील चार रुग्ण, ६१ ते ७० वयोगटातील तीन रुग्ण, ७१ ते ८० वयोगटातील दोन रुग्णांचा समावेश आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये पुरूष ५६ टक्के तर महिला ४४ टक्के असल्याचेही कळवले आहे.

घाटीत ४० जणांची तपासणीः घाटीत आज दुपारी चार वाजेपर्यंत ४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १५ रुग्णांचा स्वॅब घेण्यात आला. दोन रुग्णांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. 13 रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे. एकूण ६९ रुग्ण घाटीत भरती आहेत. तसेच औरंगाबाद शहरातील बीड बायपास रोडवरील देवळाई परिसरातील कोविड (कोरोना) बाधित ५५ वर्षीय पुरूष रुग्णाचा रविवार, ३ मे रोजी रात्री ११ वाजता उपचारादरम्यान न्युमोनिआ, कोविड, श्वसनविकाराने मृत्यू झाला. त्यांना दोन्ही फुफ्फुसांचा न्यूमोनिआ, मधुमेहाचा आजार होता. आतापर्यंत १० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचेही डॉ. येळीकर आणि माध्यम समन्वयक  डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा