राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषितः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

0
16

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे. या रुग्णालयामुळे २ हजार ३०५ खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना  केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असेल.

जिल्हा आणि अधिसूचित रुग्णालयाचे नावे अशी: ठाणे जिल्हा रुग्णालय, टी.बी बिल्डींग (१०० बेड ), मीरा भाईंदर पंडित भीमसेन जोशी रुग्णालय (१०० बेड), वाशी सामान्य रुग्णालय (१२० बेड), कल्याण-डोंबिवली मनपा शास्त्री नगर दवाखाना (१०० बेड), रायगड पनवेल उपजिल्हा रुग्णालय (१०० बेड ), नाशिक कुंभमेळा बिल्डिंग व महानगरपालिका कठडा हॉस्पिटल अनुक्रमे (१०० बेड) (७० बेड), अहमदनगर जिल्हा रुग्णालय (१०० बेड), नंदूरबार डोळ्यांचा दवाखाना (५० बेड), धुळे जिल्हा रुग्णालय शहारातील इमारत (५० बेड), पुणे जिल्हा रुग्णालय, औंध (५० बेड), सातारा सामान्य रुग्णालय (६० बेड), सिंधुदुर्ग नवीन इमारत एएमपी फंडेड (७५ बेड), रत्नागिरी सामान्य रुग्णालय  व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे (१००) (५० बेड), औरंगाबाद जिल्हा रुग्णालय (१०० बेड), हिंगोली जिल्हा रुग्णालय (१०० बेड), हिंगोली कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (५० बेड), लातूर उदगीर उपजिल्हा रुग्णालय (५० बेड), उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय, नवीन इमारत (१०० बेड), उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (५० बेड) आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत (५०), नांदेड जिल्हा रुग्णालय जुने (५० बेड) आणि मुखेड उपजिल्हा रुग्णालय (५० बेड). अमरावती विशेषोपचार रुग्णालय नवीन इमारत (१०० बेड), वाशीम जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (५० बेड), बुलढाणास्त्री रुग्णालय नवीन इमारत (१०० बेड), वर्धा सामान्य रुग्णालय (५० बेड), भंडारा सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नवीन इमारत (८० बेड) आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालय (१०० बेड) या सर्व जिल्हा रुग्णालयातील सर्व खाटा मिळून २ हजार ३०५ खाटा कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध होतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा