राज्यात आज आढळले ३ हजार ४१ नवे कोरोना रूग्ण, एकूण रूग्णसंख्येने ओलांडला ५० हजार पार

0
244
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई: राज्यात आज ३ हजार ४१ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० हजार २३१ झाली आहे. राज्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १६३५ झाली आहे. आज झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील २४ तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २३ एप्रिल ते २० मे या कालावधीतील आहेत. या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३९, पुण्यात ६,  सोलापूरात ६, औरंगाबाद शहरात ४, लातूरमध्ये १, मीरा भाईंदरमध्ये १, ठाणे शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३४  पुरुष तर २४ महिला आहेत.

साडेतीन लाखांहून अधिक चाचण्याः आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ३ लाख ६२ हजार ८६२ नमुन्यांपैकी ३ लाख १२ हजार ६३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५० हजार २३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ९९ हजार ३८७ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ३५ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील:(कंसात मृत्यूंची आकडेवारी):

मुंबई महानगरपालिका: ३०,५४२ (९८८)
ठाणे: ४२० (४)
ठाणे मनपा: २५९० (३६)
नवी मुंबई मनपा: २००७ (२९)
कल्याण डोंबिवली मनपा: ८८९ (७)
उल्हासनगर मनपा: १८९ (३)
भिवंडी निजामपूर मनपा: ८६ (३)
मीरा भाईंदर मनपा: ४६४ (५)
पालघर:११४  (३)
वसई विरार मनपा: ५६२ (१५)
रायगड: ४१२ (५)
पनवेल मनपा: ३३० (१२)
ठाणे मंडळ एकूण: ३८,५८५ (१११०)

नाशिक: ११५
नाशिक मनपा: ११० (२)
मालेगाव मनपा: ७११ (४४)
अहमदनगर: ५३ (५)
अहमदनगर मनपा: २०
धुळे: २३ (३)
धुळे मनपा: ९५ (६)
जळगाव: २९४ (३६)
जळगाव मनपा: ११७ (५)
नंदूरबार: ३२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १५७० (१०३)

पुणे: ३४० (५)
पुणे मनपा: ५०७५ (२५१)
पिंपरी चिंचवड मनपा: २६७ (७)
सोलापूर: २४ (२)
सोलापूर मनपा:५२२ (३२)
सातारा: २७९ (५)
पुणे मंडळ एकूण: ६५६२ (३०९)

कोल्हापूर:२३६ (१)
कोल्हापूर मनपा: २३
सांगली: ६९
सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी:  १५५ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: ५०४ (५)

औरंगाबाद:२३
औरंगाबाद मनपा: १२३३ (४६)
जालना: ५६
हिंगोली: ११२
परभणी: १७ (१)
परभणी मनपा: ५
औरंगाबाद मंडळ एकूण: १४४६ (४७)

लातूर: ६७ (३)
लातूर मनपा: ४
उस्मानाबाद: ३१
बीड: २६
नांदेड: १५
नांदेड मनपा: ८३ (५)
लातूर मंडळ एकूण: २२६ (८)

अकोला: ३६ (२)
अकोला मनपा: ३६६ (१५)
अमरावती: १३ (२)
अमरावती मनपा:  १५५ (१२)
यवतमाळ: ११५
बुलढाणा:४० (३)
वाशिम: ८
अकोला मंडळ एकूण:७३३ (३४)

नागपूर: ७
नागपूर मनपा: ४६४ (७)
वर्धा: ४ (१)
भंडारा: १०
गोंदिया: ३९
चंद्रपूर:  १०
चंद्रपूर मनपा: ९
गडचिरोली: १३
नागपूर मंडळ एकूण:  ५५६ (८)
इतर राज्ये: ४९ (११)
एकूण रूग्णसंख्या: ५० हजार २३१   एकूण मृतांची संख्याः १६३५

(टीपः ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा