औरंगाबाद एकूण ८७२ : आज ३० रूग्णांची वाढ, एमजीएममध्ये तिघांना बाधा; २४ तासांत ४ बळी

0
218

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात आज ३० कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८७२ झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. या ३० कोरोना बाधितांमध्ये एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या तिघांचा समावेश आहे. दरम्यान, औरंगाबादेत गेल्या २४ तासात कोरोनामुळे  ४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचाः लॉकडाऊनमध्ये आरोग्य विभागात १७ हजार ३३७, वैद्यकीय शिक्षण विभागात ११ हजार पदांची भरती

आज आढळलेल्या रूग्णांत  एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातील ३,  सादात नगरमधील ४, राम नगरमधील ३, संजय नगर गल्ली नं.६ मधील ३, एमआयडीसी, जालान नगर, हनुमान चौक- चिकलठाणा, किराडपुरा, बजाज नगर, जिन्सी- रामनासपुरा, जुना मोंढा- भवानी नगर गल्ली नं.५. जहागीरदार कॉलमी, आदर्श कॉलनी, रोशन गेट या भागातील प्रत्येकी १ रूग्णाचा समावेश आहे. तर अन्य ७ रूग्णांचाही समावेश आहे. आज आढळलेल्या रूग्णात १७ पुरूष आणि १३ महिलांचा समावेश आहे.

हेही वाचाः पहिल्या दिवशी राज्यातील ५ हजार ४३४ ग्राहकांनी मागवली घरपोच दारू!

घाटी रुग्णालयात मागील चोवीस तासात औरंगाबाद शहरातील नवीन हनुमान नगर येथील ७४ वर्षीय, बायजीपुरा येथील ७० वर्षीय, शहानूर मियाँ येथील ५७ वर्षीय  आणि हिमायत नगर येथील ४० वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत २५ कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असल्याचेही त्यांनी कळवले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा