राज्यात नवीन ३२८ रुग्ण, ११ जणांचा मृत्यू; एकूण कोरोना बाधितांची संख्या ३,६४८

3
46
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई: राज्यात आज ३२८ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. आज दिवसभरात ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३०७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

दरम्यान, आज राज्यात ११ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २११ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील ५ आणि पुणे येथील ४ तर १ मृत्यू औरंगाबाद मनपा आणि १ मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. त्यात ६ पुरुष तर ५ महिला आहेत. त्यामध्ये  ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये (८२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३४४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५९९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २३ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

3 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा