औरंगाबाद जिल्ह्यात आज ३२९ नवे कोरोना बाधित, एकूण रूग्णसंख्या ३१ हजार ७७२ वर

0
8

औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यात आज ३२९ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३१ हजार ७७२ झाली आहे तर आज ४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या ८९० वर पोहोचली आहे.

दुसरीकडे आज औरंगाबाद महानगर पालिका हद्दीतील ८७ आणि ग्रामीण भागातील ९९ अशा १८६ कोरोना बाधितांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत २४ हजार ६९२ कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले असून सध्या ६ हजार १९० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

महापालिका हद्दीत १०० रूग्णः बन्सीलाल नगर ५, गारखेडा परिसर ५, विशाल नगर ४, गादिया विहार ४, माळी गल्ली चिकलठाणा ३, रेणुका एन्क्लेव्ह ४,  मृत्यूजंय सोसायटी, १, एन बारा हडको १, मार्ड हॉस्टेल १, एनआरएच हॉस्टेल २, गजानन नगर १, एन नऊ हडको १, खिंवसरा पार्क १, मयूर पार्क २, कासार गल्ली १, सिंधी कॉलनी १, टिळक नगर १, जय भवानी नगर १, कोकणवाडी १, पडेगाव २, जय नगर १, बीड बायपास २, एन नऊ शिवनेरी कॉलनी १, एन सात म्हाडा कॉलनी १, एन सहा संभाजी कॉलनी १, जुना बायजीपुरा १, एन अकरा द्वारका नगर १, हडको २, उस्मानपुरा २, छाया नगर १, छत्रपती नगर, देवळाई चौक १, एन पाच कॅनॉट २, नागेश्वरवाडी १, बेगमपुरा १, शिवदत्त सोसायटी, १, वेदांत नगर १,  पुंडलिक नगर २, चिकलठाणा २, नवीन सातारा परिसर १, मयूर टेरेस, गारखेडा १, सातारा परिसर १, नाईक नगर २, बजाज हॉस्पीटल जवळ १, चाटे स्कूल परिसर १, अथर्व क्लासिक, बीड बायपास १, हनुमान नगर १, दर्गा रोड १, जटवाडा २, भीम नगर १, भानुदास नगर १, सावित्री नगर १, हनुमान चौक, चिकलठाणा १, रायगड नगर १, फुले नगर १, संत ज्ञानेश्वर नगर १, पुंडलिक नगर १, देवळाई परिसर १, शिवशक्ती कॉलनी २, कैलास नगर १, अहिंसा नगर १, शहानूरवाडी १, अबरार कॉलनी १, शंकर हॉस्पिटल परिसर १, पिसादेवी २, सूतगिरणी चौक, गारखेडा १, लघुवेतन कॉलनी, मुकुंदवाडी १, एन एक सिडको १, जने बजाज हॉस्पिटल परिसर १ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात १२६ रूग्णः वैजापूर ११, लासूर स्टेशन ८, खतखेडा, कन्नड ४, देवगाव रंगारी ४, जय भवानी नगर, पैठण ३, पिशोर, कन्नड ३, अन्नपूर्णा नगर, पैठण ३, करमाड १, जोगेश्वरी १, देवगिरी नगर, बजाज नगर २, अक्षयतृतीया सोसायटी, बजाज नगर १, अल्फोन्सा शाळेजवळ, बजाज नगर १, देवका अपार्टमेंट, बजाज नगर १, सरस्वती सोसायटी, बजाज नगर १, बजाज नगर १, जय भवानी चौक, बजाज नगर २, श्रीराम चौक, बजाज नगर १, सिद्धेश्वरी विहार, जोगेश्वरी १, गणेश चौक, वाळूज १, समता नगर, वाळूज १, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, शनि मंदिराजवळ, कन्नड १, एमआयडीसी पैठण १, धानोरा, गंगापूर १, मांजरी, गंगापूर १, जामगाव, गंगापूर १, शिक्षक कॉलनी, सिल्लोड १,  बोकुड जळगाव १, शांती समता कॉलनी, कन्नड १, विद्या नगर, कन्नड १, देशपांडे गल्ली वैजापूर १, जीवनगंगा, वैजापूर २, समृद्धी गेस्ट हाऊस, वैजापूर १, म्हसोबा मंदिर, वैजापूर १, औरंगाबाद २१, फुलंब्री ७, गंगापूर १८, कन्नड ५, खुलताबाद २, सिल्लोड ३, पैठण ३, सोयगाव १ रूग्ण आहेत.

चार कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटीत घाटी परिसरातील ७६ वर्षीय पुरूष, औरंगाबादमधील ४१ वर्षीय पुरूष, जय मल्हार नगर, गारखेडा परिसरातील ८५ वर्षीय पुरूष आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात फुलंब्री तालुक्यातील सिरोडीमधील ७० वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा