औरंगाबादेत आज दिवसभरात आढळले ३३९ कोरोना बाधित रुग्ण, ९ जणांचा मृत्यू

0
23

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ३३९ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले तर ९ रूग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३२ हजार ७७९ वर पोहोचली आहे. तर आजपर्यंत ९०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज महानगर पालिका हद्दीतील २२६ आणि ग्रामीण भागातील ९५ अशा ३२१ जणांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत २५ हजार ७२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या एकूण ६ हजार १४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज औरंगाबाद शहरात १०९ कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यात सुराणा नगर ५, धनश्री कॉलनी, मयूर पार्क ३, मयूर पार्क ४, एन-दोन संघर्ष नगर ४, मिलिट्री हॉस्पिटल ४, नवयुग कॉलनी ४, लाईफलाइन हॉस्पीटल परिसर ४, एन-सात सिडको ३, शिल्पसमृद्धी अपार्टमेंट ३, पोलिस कॉलनी, एन दहा हडको २, उस्मानपुरा २, नागेश्वरवाडी २, विष्णू नगर, जवाहर कॉलनी २, देवगिरी व्हॅली, मिटमिटा २, पिसादेवी २, ठाकरे नगर २, एन-चार सिडको २, गादिया पार्क २, , उल्कानगरी २, जलाल कॉलनी १, हर्सूल-सावंगी १, मिरा नगर, पडेगाव १, पद्मपुरा १, सहारा हॉटेल परिसर १, पैठण गेट १, एन दोन सिडको १, कामगार चौक १, रेल्वे स्टेशन परिसर १, गजानन नगर १, गुरूदत्त नगर १, राम नगर १, एन चार सिडको १, एन दोन ठाकरे नगर १, एन चार गजानन नगर १, एन सहा साई नगर १, एन पाच सिडको १, एन दोन राम नगर १, एन दोन म्हाडा कॉलनी १, कासारी बाजार १, एन अकरा हडको १, सावित्री नगर, चिकलठाणा १, बंजारा कॉलनी १, रेणूका नगर १, आशा नगर १, हडको १, अरुणोदय कॉलनी १, चेलिपुरा १, भीम नगर १, भडकल गेट १, जाधववाडी १, मिलिनियम पार्क सोसायटी १, एन-तेरा, भारत नगर १, कोकणवाडी १, समृद्धी अपार्टमेंट, अपेक्स हॉस्पीटल मागे १, पारिजात नगर, मनजित नगर, जालना रोड १,  साईनाथ नगर, बीड बायपास १,  अशोक नगर १, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप १, संत एकनाथ सो., जालना रोड १, दिवाणदेवडी १, स्नेह नगर, बीड बायपास १, बालाजी नगर १,  विजयश्री कॉलनी, एन पाच सिडको १,  महालक्ष्मी चौक, ठाकरे नगर १,  कासलीवाल मार्केट, एन दोन सिडको १,  अहिंसा नगर १, देशमुख नगर, गारखेडा परिसर १, कासलीवाल पूर्वा सोसायटी चिकलठाणा १, सारासिद्धी, बीड बायपास १, दशमेश नगर १, अन्य ४ असे रूग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ११३ रूग्ण आढळले. त्यात औरंगाबाद ग्रामीण २९, कन्नड २५, वैजापूर ११, दारवाडी, पैठण ९, सिडको महानगर एक ३, गंगापूर ३, हरशी खु., पैठण २, गोळेगाव, सिल्लोड २, परदेशी गल्ली वैजापूर २, निवारा नगरी, वैजापूर २, फुलंब्री २, विवेकानंद कॉलनी, कन्नड २, साऊथ सिटी १,                                महालकिन्होळा, फुलंब्री १, साई मंदिर परिसर, बजाज नगर १, स्वागत सो., बजाज नगर १, निरंकार नगर, वडगाव को. १, पानवडोद, सिल्लोड १, प्रगती कॉलनी, कन्नड १, कारखाना परिसर, कन्नड १, करमाड १, धानोरा, गंगापूर १, जयसिंगनगर, गंगापूर १, वाळूज १, सवंडगाव, वैजापूर १, मारवाडी गल्ली, वैजापूर १, एनएमसी कॉलनी, वैजापूर १, खुलताबाद १, जावळी, कन्नड १, असेगाव १, अयोध्या नगर १, पैठण १, पळशी कन्नड १ असे रूग्ण आहेत.  

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटीत बजाज नगरातील ४५ वर्षीय पुरूष, औरंगाबादेतील ८० वर्षीय स्त्री, खंडाळा, वैजापुरातील ७० वर्षीय पुरूष, शिऊर, वैजापुरातील ७० वर्षीय पुरूष, मिसरवाडीतील ५५ वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात शिवाजी नगरातील ४७ वर्षीय पुरूष, जवाहर नगर पोलिस स्टेशन जवळील गारखेडा परिसरातील ६२ वर्षीय पुरूष, विष्णू नगरातील ५८ वर्षीय पुरूष आणि बीड बायपास, बाळापूर फाटा येथील ५५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा