औरंगाबादेत दिवसभरात आढळले ३४२ कोरोना बाधित, १० रूग्णांचा मृत्यू

0
87
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ३४२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २५ हजार २३१ वर पोहोचली असून मृतांचा आकडाही ७४१ वर गेला आहे.

दरम्यान, आज महापालिका हद्दीतील १५२ आणि ग्रामीण भागातील १२२ अशा एकूण २७४ कोरोना बाधित रूग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत १९ हजार ४०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ५ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटिजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ८४, मोबाइल स्वॅब कलेक्शन पथकास ८५ आणि ग्रामीण भागात ६७ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

ग्रामीण भागात आज १११ रूग्ण आढळले. त्यात औरंगाबाद ग्रामीण ३०, फुलंब्री ६, गंगापूर १२, कन्नड ८, घोडेगाव १, गेवराई १, अज्वा नगर, वाळूज १, दुधड २, होली चौक, अंधानेर, कन्नड १, स्वामी समर्थ कॉलनी, कन्नड २, शांती नगर, कन्नड १, जळगाव घाट, कन्नड १, कारखाना परिसर, कन्नड १, माळीवाड, कन्नड २, शशी विहार पैठण २, अवडे उचेगाव, पैठण १, नारळा, पैठण १, पंकज हॉस्पीटल परिसर, पैठण २, राम नगर, पैठण १, परदेशीपुरा, पैठण १, अन्नपूर्णा नगर, पैठण ३, नवीन कावसान पैठण २, लगड वसती, गंगापूर १, रांजणगाव, गंगापूर १, जामगाव, गंगापूर २, मांजरी, गंगापूर १, निमखेडा, सिल्लोड १, घाटनांद्रा, सिल्लोड १, मारवाडी गल्ली, वैजापूर १, बजाज नगर २, गंगापूर रोड, वैजापूर १, पिशोर, कन्नड १, खुलताबाद १, किनगाव, फुलंब्री १, संभाजी कॉलनी, कन्नड २, सिल्लोड १, वैजापूर ५, पैठण ५, सोयगाव २ रुग्ण आहेत.

औरंगाबाद महापालिका हद्दीत  दिवसभरात ६२ रुग्ण आढळले. त्यात जाधववाडी १, पिसादेवी १, मकई गेट १,  उस्मानपुरा १, चिकलठाणा १, केतकी गार्डन परिसर १, ज्योती नगर १, सावरकर नगर, एन पाच सिडको ३, श्रेय नगर १, देवानगरी परिसर १, प्रताप नगर ३,  श्रीकृष्ण नगर १, प्रथमेश नगर,देवळाई रोड १, हरिओम नगर, देवळाई परिसर १, हरिराम नगर, बीड बायपास १, रमाई नगर, बीड बायपास १, खंडोबा मंदिराजवळ, सातारा परिसर १, समर्थ नगर १, एकनाथ नगर, उस्मानपुरा १, पैठण रोड, कांचनवाडी १, सिंधी कॉलनी १, वर्धमान रेसिडन्सी १, कासलीवाल उद्योग, शिवाजी नगर १, सदाशिव नगर १, एन चार सिडको १, एन सहा साई नगर १, वैभव लक्ष्मी, जनकपुरी कॉलनी २, तोफखाना बाजार, छावणी १, म्हाडा कॉलनी १, वेदांत नगर २, सहकार नगर १, इटखेडा १, सेक्टर सात, संस्कृती अपार्टमेंट, पैठण रोड १, उत्तम नगर, जवाहर कॉलनी १, म्हाडा कॉलनी १,  पोलिस कॉलनी १, माया नगर, एन दोन सिडको १, चौधरी कॉलनी १, सातारा परिसर २, एन सात सिडको १, प्रगती कॉलनी १, अविष्कार कॉलनी १, एन तीन सिडको १, एन दोन सिडको, न्यू एस टी कॉलनी १, गारखेडा परिसर १, अन्य १० रुग्ण आहेत.

दहा कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटीत शहरातील ३० आणि ६० वर्षीय स्त्री, टीव्ही सेंटरमधील ६० वर्षीय स्त्री, पैठणमधील ७० वर्षीय पुरूष, नर्सरी कॉलनी, रांजणगावातील ६४ वर्षीय पुरूष, बाजार गल्ली, सोयगावातील ६५ वर्षीय पुरूष, चेतना नगर, हर्सुलमधील ७२ वर्षीय स्त्री आणि खासगी रूग्णालयांत पैठणमधील हमालगंजी येथील ६५ वर्षीय,एन चार सिडकोतील ६७ आणि पिंपळगाव फुलंब्रीतील ७२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा