महाराष्ट्रात ४२,७१३ व्यक्ती होम क्वारंटाइन; ६३५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, ३२ जणांचा मृत्यू

0
150

मुंबईः महाराष्ट्रात कोरोना विषाणुचा संसर्ग हळूहळू राज्यभर पसरू लागला असून राज्यातील तब्बल ४२,७१३ व्यक्ती होम क्वारंटाइन तर २९१३ व्यक्ती हॉस्पिटल क्वारंटाइन आहेत. शनिवारी १४५ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६३५ वर पोहोचली आहे. आज ६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडाही ३२ वर पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. औरंगाबादेत शनिवारी आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे तेथील बाधितांची संख्या तीन झाली आहे.

शनिवारी राज्यात मृत्यू झालेल्या रूग्णांपैकी ४ जण मुंबईतील आहेत तर  एक जण ठाण्याच्या मुंब्रा येथील तर दुसरा रूग्ण अमरावती येथील आहे.

हेही वाचाः १,५०० जणांना तेराव्याचे जेवण देणारी दुबई रिटर्न व्यक्ती पॉझिटिव्ह, मोरेनात २६,००० लोक क्वारंटाइन

राज्यात शनिवारी ७०८ कोरोना संशयित रूग्ण विविध रूग्णालयांत दाखल झाले आहेत. राज्यात आजपर्यंत १४ हजार ५०३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १३ हजार ७१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ६३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ४२ हजार ७१३ व्यक्ती होम क्वारंटाइन असून २९१३ व्यक्ती हॉस्पिटल क्वारंटाइन आहेत.

हेही वाचाः महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, जनतेसाठी मी कोणत्याही थराला जाईनः मुख्यमंत्री ठाकरे

निझामुद्दीनला गेलेल्यांपैकी ७ कोरोनाबाधितः दिल्लीच्या निझामुद्दीन येथील मरकझमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांचा युद्ध पातळीवर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या १२२५ व्यक्तींच्या यादीपैकी १०३३ लोकांशी संपर्क झाला असून त्यापैकी ७३८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तींपैकी राज्यात ७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात पुणे- पिंपरी-चिंचवड येथील प्रत्येकी २, अहमदनगर भागातील एक आणि एक जण हिंगोलीतील आहे.

हेही वाचाः मोदींनी सांगितल्यानुसार सर्व घरातील लाइट बंद केल्यास राज्य ८ दिवस अंधारात बुडण्याचा धोका

कोरोनाबाधितांचा तपशील असाः
मुंबईः ३७७
पुणे (शहर व ग्रामीण): ८२
सांगलीः २५
मुंबई वगळता ठाणे मंडळातील मनपाः ७७
नागपूर/ अहमदनगरः प्रत्येकी १७
यवतमाळः ४
सातारा, औरंगाबाद, उस्मानाबादः प्रत्येकी ३
कोल्हापूर, रत्नागिरी, जळवागः प्रत्येकी २
सिंधुदुर्ग,गोंदिया, नाशिक, वाशिम, अमरावती, हिंगोलीः प्रत्येकी १

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा