बेफिकीर औरंगाबादकरांना धोक्याचा इशाराः आज दिवसभरातच आढळले ४३८ कोरोना बाधित

0
109
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल ४३८ कोरोना बाधित रूग्ण आढळले. एरवी पाच- दहा कोरोना बाधित रूग्ण आढळले तरी घाबरून जाणारे औरंगाबादकर सध्या बिनधास्त आहेत आणि त्यापैकी किमान ७५ टक्के औरंगाबादकर तर विनामास्क फिरत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता २५ हजार ९७९ वर गेली आहे.

दरम्यान, आज औरंगाबाद महापालिका हद्दीतील ६५ आणि ग्रामीण भागातील १४९ जणांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत एकूण ७५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५ हजार ३३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटिजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर १२६, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास १२६ आणि ग्रामीण भागात ७१ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. मला काही होत नाही, ही औरंगाबादकरांची प्रवृत्ती या प्रसाराला कारणीभूत असल्याचेच चित्र आहे.

ग्रामीण भागात आज ११४ रूग्ण आढळले. त्यात औरंगाबाद ग्रामीण २१ फुलंब्री १२, वैजापूर १२, सिल्लोड १२, गंगापूर ७, पैठण ४,  ग्रामीण रुग्णालय क्वार्टर परिसर, कन्नड ४, मोठी वाडी, खुलताबाद १, साई मंदिर बजाज नगर २, सलामपूर, वडगाव, बजाज नगर १, दौलताबाद पोलिस स्टेशन परिसर १, द्वारकानगरी, पडेगाव १, संभाजी कॉलनी, कन्नड २, टिळक नगर, कन्नड १, शुलीभंजन, खुलताबाद १, घोडेगाव, खुलताबाद ५, अन्नपूर्णा हॉटेल, पैठण १, जैनपुरा, पैठण १, नारळा,पैठण १, नाथ गल्ली, पैठण १, भाऊसाहेब नगर, पैठण १, परदेशीपुरा, पैठण २, मुद्देश वडगाव २, लासूर स्टेशन १, उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर १, शिक्षक कॉलनी, गंगापूर १, जयसिंग नगर, गंगापूर १, नर्सिंग कॉलनी, गंगापूर १, वांजणापूर, गंगापूर १,पोलिस स्टेशन, गंगापूर १, खामगाव, वैजापूर २, आनंद नगर,वैजापूर १, गंगापूर रोड, वैजापूर १ वडद, कन्नड १,  , कन्नड ६ असे रूग्ण आहेत.

औरंगाबाद महापालिका हद्दीत आज ७२ रूग्ण आढळले. त्यात घाटी परिसर २, मार्ड हॉस्टेल परिसर १, मुकुंदवाडी ५, एन बारा हडको १, आदित्य नगर, मयूर पार्क १, बालाजी नगर १, गुरूकृपा सो., चाणक्य पुरी १, गुरूजन सो., ३, मोतीकारंजा १, एन पाच, प्रियदर्शनी कॉलनी, सिडको १, ठाकरे नगर २, कॅनॉट परिसर १, दिवाण देवडी १, बीड बायपास २, संकल्प नगर, मयूर पार्क १, छत्रपती नगर १, बजाज नगर १, एन पाच सिडको १,  संतोषीमाता नगर, मुकुंदवाडी १, सातारा परिसर १, विवेकानंद नगर, हडको १, उदय कॉलनी, खडकेश्वर १, उस्मानपुरा १, छावणी परिसर १, न्यू श्रेय नगर १, पद्मपुरा ५, योगिता सो., एन आठ सिडको १, यशवंत नगर, बीड बायपास २, राहुल नगर १, उल्का नगरी १, जाधववाडी १, सिंधी कॉलनी १, पडेगाव १, ज्योती नगर १, प्रताप नगर १, अरुणोदय कॉलनी, बीड बायपास १, हनुमान नगर १, डांगे कॉम्प्लेक्स मुकुंदवाडी १, न्यू एस टी कॉलनी १, अंबिका नगर १, राजीव गांधी नगर १, गंगोत्री पार्क परिसर १, अन्य ६, गारखेडा १, एन एक सिडको १, एन दोन सिडको १, कैलास नगर १, मयूर पार्क, हर्सुल १, एन सात सिडको १, देवगिरीपूरम, हर्सुल १, ज्युब्ली पार्क १,  हर्सुल सावंगी १, देवळाई परिसर १

चार कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटीत नारेगावातील ४०, हमालवाडा, रेल्वे स्टेशन येथील ४० वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात एन दोन राम नगरातील  ६२ वर्षीय पुरूष, विष्णू नगरातील ४८ वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा