औरंगाबादेत आज ४५ नवीन कोरोना बाधित रूग्ण, एकूण रूग्णसंख्या २ हजार ६५

0
65

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ४५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ६५ झाली आहे. यापैकी १ हजार २२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १०४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ७३७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आज आढळलेल्या रूग्णांमध्ये  पीर बाजार- उस्मानपुरा भागात ८, एन-नऊ, संत ज्ञानेश्वर नगर- एन-९ भागात ५, सातारा परिसरात ३, चिकलठाण्यात २, सादाफ कॉलनी, कटकट गेट परिसरात २, विद्या निकेतन कॉलनीत २ आणि शिवशंकर कॉलनी, बौद्ध नगर, पोलिस क्वार्टर-तिसगाव, भोईवाडा-मिलकॉर्नर, पद्मपुरा, फाजीलपुरा-मोहनलाल नगर, सिडको एन-नऊ-रेणुका माता मंदिर, न्यू हनुमान नगर-गारखेडा, मजनू हिल-दमडी मोहल्ला, ज्युबली पार्क, गारखेडा परिसर, बौद्ध नगर-जवाहर कॉलनी, पुंडलिक नगर, भोईवाडा, शिवाजी नगर-गारखेडा, सेंट्रल नाका-बायजीपुरा,एन-चार-सिडको, कैलास नगर, गणेश नगर-पंढरपूर परिसर या भागात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे. अन्य भागात २ आणि गंगापूर तालुक्यातील  देवशी पिंपळगाव आणि सोयगाव तालुक्यातील सावरखेडा येथेही प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे. आढळलेल्या रूग्णांमध्ये २७ पुरूष आणि १८ महिला आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा