राज्यात ५ लाख ९४ हजार व्यक्ती क्वारंटाइन

0
21
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ६६ हजार ९३७ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख ९४ हजार ५४३  व्यक्तींना कॉरंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ९ जून या कालावधीत कलम १८८ नुसार १,२४,३६९ गुन्हे नोंद झाले असून २३,९८६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ८६ लाख ७४ हजार ६९१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २६३ घटना घडल्या. त्यात ८४६ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाइन असा शिक्का आहे अशा ७२२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,९४,५४३ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८०,८९० वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

पोलिसांत सध्या १४५९ कोरोना बाधितः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मुंबईतील २० पोलीस व १ अधिकारी अशा एकूण २१, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा ३४ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १९० पोलीस अधिकारी व १२६९ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा