राज्यात आज ५ हजार ३६३ नवे कोरोना बाधित रूग्ण, ७ हजार ८३६ रुग्णांना डिस्चार्ज

0
35

मुंबई: राज्यात आज ७,८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोना बाधित बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३९ टक्के एवढे झाले आहे.

दरम्यान, आज राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ११५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ५४ हजर ०२८ (१९.०१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २५ लाख २८ हजार ९०७ व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर १३ हजार २३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यात एकूण १ लाख ३१ हजार ५४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा