मराठवाड्यात एकूण ६० कोरोनाबाधित रूग्ण, आतापर्यंत ३ हजार ८८६ जणांची तपासणी

0
46

औरंगाबाद  मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत आतपर्यंत एकूण ६० कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ३८ रुग्ण औरंगाबादेत आढळले असून त्यापैकी ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर लातूरमध्ये ८, हिंगोलीत ७, उस्मानाबादेत ३, जालन्यात २, परभणी- नांदेडमध्ये प्रत्येकी १ रूग्ण आढळून आले आहेत. सध्या मराठवाड्यात विविध रुग्णालयांत २८ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात आतापर्यंत तपासणीसाठी एकूण नमुने ३,८८६ नमुने घेण्‍यात आले आहेत. त्‍यापैकी ३,४७९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून ३५९ चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी ३,४१९ नमुने निगेटिव्ह तर ६० नमुने पॉझिटिव्ह आहेत. ४८ नमुने मानांकानुसार नसल्‍याने परत करण्‍यात आले आहेत. आतापर्यंत ५ रुग्‍णांचा मृत्‍यू झालला आहे व २७ रुग्‍ण हे कोराना विषाणू संक्रमणातून बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मराठवाड्यात सध्‍या २,९३९ व्‍यक्तिंना घरीच विलगीकरणात व १,१०६ व्‍यक्तिंना संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍यात आले आहे. १,४८० व्‍यक्तिंना अलगीकरण कक्षात (Isolation ward)  ठेवण्‍यात आले आहे. मराठवाड्यात आढळून आलेल्‍या कोरोना बाधित रुग्‍णांच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींचाही पाठपुरावा करण्‍यात येत असून आतापर्यंत अशा १,४५७ व्‍यक्‍तींचा शोध घेण्‍यात आलला आहे. यापैकी ५३९ लोकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले असून त्‍यामध्‍ये २२ नमुने पॉजिटिव्‍ह, ४९४ नमुन्यांचे निगेटिव्ह अहवाल प्राप्‍त झाले आहेत. २३ स्‍वॅबचे अहवाल प्रलंबित आहे.

मराठवाड्याला मिळणार १२२ व्हेंटिलेटरः  मराठवाड्यात कोरोना संसर्गावर उपचार व प्रतिबंधासाठी १२२ व्हेंटिलेटर खरेदीला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यात जालन्यासाठी १०, नांदेडच्या शासकीय रुग्णालयासाठी १० आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५ असे एकूण २५, हिंगोलीसाठी ७, बीडसाठी २०, लातूरसाठी ८, उस्मानाबादसाठी ३६, अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १० आणि औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी ५ व्हेंटिलेटरचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा