भारतातील कोरोना बाधितांची संख्या २१ लाखांच्या जवळ, २४ तासांत आढळले ६१ हजार ५३७ रूग्ण

0
10

नवी दिल्लीः भारतातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल ६१ हजार ५३७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत तर ९३३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या रूग्णांबरोबरच देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या २० लाख ८८ हजार ६१२ वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २० लाख ८८ हजार ६१२ झाली आहे. त्यात ६ लाख १९ हजार ८८ सक्रीय रूग्ण आहेत तर आतापर्यंत १४ लाख २७ हजार ६ रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात एकूण ४२ हजार ५१८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांच्या संख्येत देशात शुक्रवारी सर्वाधिक वाढ झाली. अवघ्या २४ तासांत ६२ हजार ५३८ कोरोना बाधित आढळून आले होते. एकूण पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात भारत आता अमेरिका आणि ब्राझीलनंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

 देशात ३० जानेवारी रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर एकूण संख्येचा आकडा २० लाखांवर पोहोचण्यासाठी अवघे १९० दिवस लागले आहेत. २६ जूनपर्यंत देशात ५ लाख कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते. १७ जुलैपर्यंत ही संख्या दुप्पट झाली आहे. त्यानंतर अवघ्या तीनच आठवड्यांत १० लाख कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.

जगभरातील आकडेवारीवर नजर टाकली असता जगात आतापर्यंत १ कोटी ९२ लाख लोकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे तर ७ लाख १९ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा