औरंगाबादेत कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढली; ६५ नवे रूग्ण, ४ जणांचा मृत्यू

0
144

औरंगाबाद: औरंगाबादेत गेले तीन चार दिवस कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येत घट आढळून येत असतानाच आज दिवसभरात ६५ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ हजार ७६९ वर गेली आहे. दरम्यान, आज ४ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्याही ९२ झाली आहे.

आज आढळलेल्या रूग्णांमध्ये  सिडको एन-सहा संभाजी कॉलनीमध्ये ६, शिवशंकर कॉलनीमध्ये ५, राजा बाजारमध्ये ४, अजिंक्य नगर- गारखेड्यात ३, आंबेडकर नगर-एन-७ मध्ये ३, बेगमपुरा, रोशन गेट, चेतना नगर, गणेश कॉलनी,  सिडको एन-४- समृद्धी नगर या भागात प्रत्येकी दोन आणि लेबर कॉलनी, पडेगाव, बायजीपुरा, हर्सुल परिसर, भारतमाता नगर, संजय नगर, मुकुंदवाडी, देवळाई चौक परिसर, समर्थ नगर, शिवाजी कॉलनी, सईदा कॉलनी, एन-सात सिडको, एन-२ विठ्ठल नगर, विनायक नगर, जवाहर कॉलनी, बारी कॉलनी, हनुमान नगर-गारखेडा, मिल कॉर्नर, सिडको एन-४, क्रांती नगर, विजय नगर-गारखेडा, अयोध्या नगर, न्यू हनुमान नगर, कैलास नगर, सिडको एन-१, सुंदर नगर-पडेगाव, कटकट गेट-नेहरू नगर, जय भवानी नगर, इंदिरा नगर आणि रोहिदास नगर या भागात प्रत्येकी एक कोरोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. यात अन्य सहा रूग्णांचाही समावेश आहे.  आढळलेल्या रूग्णांत ३८ पुरूष आणि २७ महिलांचा समावेश आहे.

चार कोरोना बाधितांचा मृत्यूः  गेल्या २४ तासांत शहरात चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) रोशन गेट येथील ८५ वर्षीय कोरोनाबाधित पुरूषाचा ३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका खासगी रुग्णालयात समता नगरातील कोरोनाबाधित ४३ वर्षीय पुरूष रुग्णाचा ०३ जून रोजी सायंकाळी सहा वाजता, कैसर कॉलनीतील ६४ वर्षीय पुरूष असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज रोशन गेट येथील ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचाही याच रुग्णालयात सकाळी ८.३० वाजता मृत्यू उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ९२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले.

आतापर्यंत ११२६ जण कोरोनामुक्तः औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत १,१२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर एकूण ५५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) ७, जिल्हा सामान्य रुग्णालयातून ६ रूग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहितीही जिल्हा प्रशासनाने दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा