राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १३ हजारांजवळ, आज आढळले ६७८ रूग्ण, २७ रूणांचा मृत्यू

0
90

मुंबई: महाराष्ट्रात रविवारी ६७८ नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या १२ हजार ९७४ झाली आहे. दुसरीकडे आज २७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आजवर कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५४८ झाली आहे.

दरम्यान, राज्यात रविवारी ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  २११५ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत  ६७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. सध्या विविध रूग्णालयात एकूण १० हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

गेल्या २४ तासांत झालेल्या २७ मृत्यूपैकी मुंबई मधील २१, पुण्यातील ४, भिवंडीतील १, नवी मुंबईमधील १ मृत्यू आहे.आज झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ११ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४  रुग्ण आहेत तर १०  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे.  या २७ रुग्णांपैकी १३ जणांमध्ये (४८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

पावणेदोन लाख चाचण्याः  आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १ लाख ७० हजार १३९ नमुन्यांपैकी  १ लाख ५६ हजार  ७८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२ हजार ९७४  जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ८१ हजार ३८२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून  १३ हजार १५८  लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा