राज्यातील ७२२ रुग्ण कोरोनामुक्त,४४१ पुरूष आणि २१८ महिलांचाही समावेश

0
55

मुंबई  कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून २८१ महिला आहेत. त्यामध्ये ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल २१ ते ३० वयोगटातील १६० रुग्ण बरे झाले आहेत तर ९८ रुग्ण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत. लक्षणीय बाब अशी की ९१ ते १०० वयोगटातील एका रुग्णाने कोरोनाला हरविण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

दरम्यान, राज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची ३७४ एवढी आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात १२० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.  राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेय. २३ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात ७२२ रुग्ण घरी गेले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे २६ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याची संख्याही वाढत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहता लक्षात येईल की साधारणता ३१ ते ६० वयोगटातील ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

घरी सोडलेल्या रुग्णांची जिल्हा- मनपा निहाय संख्या

  • अहमदनगर मनपाः ५
  • अहमदनगर ग्रामीणः ११
  • औरंगाबाद मनपाः १४
  • बुलढाणाः ८
  • गोंदीया, हिंगोली, जळगाव मनपाः प्रत्येकी १
  • कल्याण-डोंबिवली मनपा- ३1
  • कोल्हापूर मनपा-२
  • लातूर ग्रामीणः ८
  • मीरा भाईंदर मनपाः ५
  • मुंबई मनपाः ३७४
  • नागपूर मनपाः १२
  • नाशिक मनपा व ग्रामीणः प्रत्येकी १
  • नवी मुंबई मनपाः १९
  • उस्मानाबादः ३
  • पालघर ग्रामीणः १
  • पनवेल मनपाः १३
  • पिंपरी-चिंचवड मनपाः १२
  • पुणे मनपाः १२०
  • पुणे ग्रामीणः ५
  • रायगड ग्रामीणः ३
  • रत्नागिरीः १
  • सांगली ग्रामीणः २६
  • साताराः ३
  • सिंधुदूर्गः १
  • ठाणे मनपाः १६
  • ठाणे ग्रामीणः ४
  • उल्हासनगर मनपाः १
  • वसई-विरार मनपाः १२
  • यवतमाळः ७

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा