महाराष्ट्रात २४ तासांत ७७१ कोरोना रूग्ण, ३५ जणांचा मृत्यू; एकूण संख्या १४ हजार ५४१

0
80

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात सोमवारी संपलेल्या नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २४६५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सोमवारी संपलेल्या २४ तासांत राज्यात ३५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १८, पुण्यातील ७, अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १आणि  नांदेड शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे. झालेल्या मृत्यूंपैकी २२ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या पैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये (७० टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार होते.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १ लाख ७६ हजार ३२३ नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार ३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १४ हजार ५४१जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९८ हजार ४२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३ हजार ६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी):
मुंबई महानगरपालिका: ९३१० (३६१)
ठाणे जिल्हाः ६४ (२)
ठाणे मनपा: ५१४ (८)
नवी मुंबई मनपा: २५४ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २२८ (३)
उल्हासनगर मनपा: ४
भिवंडी निजामपूर मनपा: २२ (२)
मीरा भाईंदर मनपा: १५२ (२)
पालघर जिल्हाः ४६ (१)
वसई विरार मनपा: १५८ (४)
रायगड जिल्हाः ४१ (१)
पनवेल मनपा: ६४ (२)
ठाणे मंडळ एकूण रूणः १०,८५७  मृत्यूः ३९०

नाशिक जिल्हाः २१
नाशिक मनपा: ३१
मालेगाव मनपा:  ३३० (१२)
अहमदनगर जिल्हाः ३५ (२)
अहमदनगर मनपा: ०७
धुळे जिल्हाः ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव जिल्हाः ४६ (११)
जळगाव मनपा: ११ (१)
नंदूरबारः १८ (१)
नाशिक मंडळ एकूण रूग्णः ५३१  मृत्यूः ३०

पुणे जिल्हाः १०२ (४)
पुणे मनपा: १७९६ (१०६)
पिंपरी-चिंचवड मनपा: १२० (३)
सोलापूर जिल्हाः ३ (१)
सोलापूर मनपा: १२६ (६)
सातारा जिल्हाः ७९ (२)
पुणे मंडळ एकूण रूग्णः २२२६   मृत्यूः १२२
कोल्हापूर जिल्हाः ८
कोल्हापूर मनपा: ६
सांगली जिल्हाः ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्गः  २ (१)
रत्नागिरीः  १० (१)
कोल्हापूर मंडळ एकूण रूग्णः ६०  मृत्यूः ३

औरंगाबाद जिल्हाः ३
औरंगाबाद मनपा: ३१० (१०)
जालनाः ८
हिंगोली ५२
परभणी जिल्हाः १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण रूग्णः ३७५  मृत्यूः ११

लातूर जिल्हाः १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड जिल्हाः ३
नांदेड मनपा: २८ (२)
लातूर मंडळ एकूण रूग्णः  ५४  मृत्यूः ३

अकोला जिल्हाः ७ (१)
अकोला मनपा: ४८ (५)
अमरावती जिल्हाः १ (१)
अमरावती मनपा: ५७ (९)
यवतमाळ: ९१
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण रूग्णः २२९  मृत्यूः १७

नागपूर जिल्हाः २
नागपूर मनपा: १७२ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर जिल्हाः १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण रूग्णः १८०  मृत्यूः २
इतर राज्ये रूग्णः  २९  मृत्यूः ५
राज्यातीलएकूण रूग्णसंख्याः १४ हजार ५४१  एकूण मृत्यूः ५८३

(टीपः ही माहिती केंद्र सरकारच्या सूचनेनुसारकोविड१९ पोर्टलवरील प्रयोगशाळांनी दिलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या अहवालात बदल होऊ शकतो.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा