राज्यात एकाच दिवशी ७७८ नवीन कोरोना रूग्ण, १४ जणांचा मृत्यू, एकूण रूग्ण संख्या ६,४२७ वर

0
47

मुंबई: राज्यात आज, गुरूवारी ७७८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात १४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६,  पुणे येथील ५, नवी मुंबई येथे १, नंदूरबार येथे १ आणि धुळे मनपा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यात ८ पुरुष तर ६ महिला आहेत.

 आज झालेल्या १४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २  रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. दोन रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकली नाही उर्वरित १२ मृत्यूंपैकी ७ रुग्णांमध्ये (५८ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा