महाराष्ट्रात आज ८ हजार १८ जण कोरोनामुक्त, ६ हजार ३३० नवे रूग्ण

0
86

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ६ हजार ३३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात  ७७ हजार २६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ८०१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. राज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी १० लाखांचा टप्पा ओलांडल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज सोडण्यात आलेल्या ८०१८ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ७०३३ (एकूण ७२ हजार २८५) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४७७ (एकूण १४ हजार ३१५), नाशिक मंडळात ३३२ (एकूण ५६०२), औरंगाबाद मंडळ ९३ (एकूण ३२१४), कोल्हापूर मंडळ १२ (एकूण १५५६), लातूर मंडळ ७ (एकूण ७०२), अकोला मंडळ ३१ (एकूण १९६४), नागपूर मंडळ ३३ (एकूण १५३४) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

राज्यात सध्या ६४ शासकीय आणि ५० खाजगी अशा एकूण ११४ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत असून दर दशलक्ष लोकसंख्येमागे राज्यातील चाचण्यांचे प्रमाण ७७१५ एवढे आहे. हे प्रमाण देशपातळीवर ६३३४ एवढे आहे. १ जुलै २०२० देशभरात ९० लाख ५६ हजार १७३ प्रयोगशाळा चाचण्या झाल्या असून त्यातील ११.२६ टक्के चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० लाख  २० हजार ३६८ नमुन्यांपैकी  १ लाख ८६ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.२९ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७२ हजार  ३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ७४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

१२५ जणांचा मृत्यूः राज्यात आज १२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ११० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्युदर ४.३८ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले १२५ मृत्यू हे मुंबई मनपा-५७, ठाणे-१, ठाणे मनपा-४, जळगाव-६, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१८, पिंपरी चिंचवड मनपा-१, सातारा-२,कोल्हापूर-१, औरंगाबाद-४, औरंगाबाद मनपा-९, जालना-२, लातूर-१,उस्मानाबाद-२, नांदेड मनपा-१, अकोला-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा