महाराष्ट्रात एकूण १५ हजार ५२५ कोरोनाग्रस्तः आज ८४१ नवीन रूग्ण, ३४ जणांचा मृत्यू

0
125

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ५२५ झाली आहे. आज ८४१ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. राज्यात आज ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ६१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील २६,पुण्यातील ६, औरंगाबाद शहरात १ तर कोल्हापूरमध्ये १ मृत्यू झाला. आज झालेल्या मृत्यूपैकी २४ पुरुष तर १० महिला आहेत.

दोन लाखांच्या जवळ चाचण्याः आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ हजार २०५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५ हजार ५२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ९९ हजार १८२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १२ हजार ४५६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी):
मुंबई महानगरपालिका: ९९४५ (३८७)
ठाणे जिल्हा : ८२ (२)
ठाणे मनपा: ४६६ (८)
नवी मुंबई मनपा: ४१५ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २२७ (३)
उल्हासनगर मनपा: १२
भिवंडी-निजामपूर मनपा: २० (२)
मीरा-भाईंदर मनपा: १८२ (२)
पालघर: ३१ (१)
वसई-विरार मनपा: १६१ (४)
रायगड: ५६ (१)
पनवेल मनपा: १०७ (२)
ठाणे मंडळ एकूण रूग्ण : ११,७०४   मृत्यूः ४१६

नाशिक जिल्हा: २१
नाशिक मनपा: २७
मालेगाव मनपा:  ३६१ (१२)
अहमदनगर जिल्हा : ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे जिल्हाः ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव जिल्हाः ४७ (११)
जळगाव मनपा: ११ (१)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण रूग्ण: ५७१  मृत्यूः ३०

पुणे जिल्हाः १०३ (४)
पुणे मनपा: १८३६ (११२)
पिंपरी-चिंचवड मनपा: १२३ (३)
सोलापूर जिल्हा: ३ (१)
सोलापूर मनपा: १२७ (६)
सातारा: ७९ (२)
पुणे मंडळ एकूण रूग्णः २२७१  मृत्यूः १२८

कोल्हापूर: ९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली जिल्हाः ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्ग: ३ (१)
रत्नागिरी: १० (१)
कोल्हापूर मंडळ एकूण रूग्णः ६२  मृत्यूः ४

औरंगाबाद जिल्हाः ३
औरंगाबाद मनपा: ३३७ (११)
जालना: ८
हिंगोली: ५५
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण रूग्णः  ४०५  मृत्यूः १२

लातूर जिल्हा: १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड जिल्हाः ३
नांदेड मनपा: २८ (२)
लातूर मंडळ एकूण रूग्णः ५४  मृत्यूः ३

अकोला जिल्हाः ७ (१)
अकोला मनपा: ५६ (५)
अमरावती जिल्हाः २ (१)
अमरावती मनपा: ५९ (९)
यवतमाळ: ९२
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण रूग्णः २४१  मृत्यूः १७

नागपूर जिल्हाः २
नागपूर मनपा: १७९ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर जिल्हाः १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण रूग्णः १८७  मृत्यूः २
इतर राज्ये: ३० (५)
एकूण रूग्णः १५ हजार ५२५        मृतांची संख्याः ६१७

( टीपःही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा