औरंगाबादः एसआरपी कॅम्पमधील ७२ जवान कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रूग्णसंख्या ४६८

0
815
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद:  औरंगाबादेतील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असतानाच आज सातारा परिसरातील राज्य राखीव दलाच्या ( एसआरपी) कॅम्पमधील तब्बल ७२ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  शहरात अन्य २० नवीन रूग्णही आढळून आल्यामुळे औरंगाबादेतील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ४६८ वर पोहोचली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात तब्बल ९० जणांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. औरंगाबादेतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाचा संसर्ग किती झपाट्याने फैलावत चालला आहे, हे स्पष्ट होत आहे.

आज आढळून आलेल्या नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये एसआरपी कॅम्पमधील ७२,  जयभीम नगराती ४, बेगमपुऱ्यातील ४, भीमनगर- भावसिंगपुऱ्यातील १,  बायजीपुऱ्यात ३ आणि शाह बाजार, ध्यान नगर- गारखेडा, एन-२ लघु वदन कॉलनी, मुकुंदवाडी, कटकट गेट, सिंकदर पार्कमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. ग्रामीण भागातील खुलताबाद येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. यामध्ये ८३ पुरूष आणि ७ महिलांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा