औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ९३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८४२ वर पोहोचली असून रूग्णवाढीचा दर अवघ्या तीनच दिवसांत दुपटीवर गेला आहे. दरम्यान, आज शहरात अवघ्या पाऊणतासांत दोन कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता २३ झाली आहे.
गेल्या चोवीस तासांत आढळलेल्या रूग्णांमध्ये हुसेन कॉलनीतील १९, एन-६,सिडकोतील २, सिल्क मील कॉलनीतील ७, पुंडलिकनगरमधील ८, न्यायनगरमधील ८, हिमायतनगरमधील ६, बायजीपुऱ्यातील ७, बुढी लेनमधील१, रोशन गेटमधील २ , संजय नगरातील १, सादात नगरातील १, भीमनगर, भावसिंगपुऱ्यातील २, , वसुंधरा कॉलनीतील १, वृंदावन कॉलनीतील ३, कैलास नगरातील १ , चाऊस कॉलनीतील ३,, भवानी नगरातील ४, जुना मोंढा, भवानी नगरातील १, रेहमानिया कॉलनीतील ४, प्रकाश नगरातील१, शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगरातील १, हुसेन कॉलनी, गल्ली नं. ५ मधील २, हनुमान नगरातील १, हुसेन नगरातील १, अमर सोसायटीतील १, न्यू हनुमान नगर, गल्ली नं.१, दुर्गा माता मंदिर परिसरातील १, बहादूरपुऱ्यातील १, रऊफ कॉलनीतील १ रूग्णाचा समावेश आहे. गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा येथेही २ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा समावेश आहे.
तासाभरात दोघांचा बळीः दरम्यान, न्यू हनुमाननगर येथील ७४ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा आज दुपारी चार वाजता घाटी रूग्णालयात मृत्यू झाला. त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू होते. दुपारी दोन वाजता या रूग्णाला घाटीत हलवण्यात आले होते. तत्पूर्वी, बायजीपुरा गल्ली क्रमांक ३२, येथील ७० वर्षीय पुरुषाचा दुपारी तीन वाजेच्या सुमारास घाटीतच मृत्यू झाला. या रूग्णालाही जिल्हा सामान्य रूग्णालयातून दुपारी सव्वादोन वाजता घाटीत भरती करण्यात आले होते.