देशात २४ तासांत ९ हजार ९९६ नवीन कोरोना बाधित रूग्ण, एक दिवसातील आतापर्यंतचा उच्चांक

0
23
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः देशात गेल्या २४ तासांत ९ हजार ९९६ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत तर ३५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून आजपर्यंतची ही सर्वात मोठी आकडेवारी आहे.

देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २ लाख ८६ हजार ५७९ झाली असून आजवर ८ हजार १०२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांपैकी १ लाख ४१ हजार रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या १ लाख ३७ हजार रूग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ९४ हजार ४१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत तर ३ हजार ४३८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल तामिळनाडूत ३६ हजार ८४१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत आणि ३२६ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये ३२ हजार ८१० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले तर ९८४ रूग्णांचा मृत्यू झाला.

गुजरातमध्ये २१ हजार ५२१ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तर १ हजार ३४७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात ११ हजार ६१० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत, ३२१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये ११ हजार ६०० कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत तर २५९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातही १० हजार ४९ कोरोना बाधित रूग्ण आढळले तर ४२७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे ४ लाख १६ हजार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७३ लाख ६० हजार झाली आहे. सर्वाधिक रूग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेतील एकूण कोरोना बाधितांची संख्या २० लाखांहून अधिक असून १ लाख १३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा