‘सगळे जनतेनेच करायचे तर सरकार काय करते?: मोदी, शहा आणि भक्तांकडे आहे का उत्तर?’

0
411

नवी दिल्लीः घरात बंद कोण आहे?  जनता… सोशल डिस्टन्सिंगचे पालन कुणी करायचे? जनतेने… बचावासाठी मास्क आणि सॅनिटायझर कुणी खरेदी करायचे? जनतेने… दान कुणी करायचे? जनतेने… वयोवृद्धांची विशेष काळजी कुणी घ्यायची? जनता… आजूबाजूच्या गरिबांना जेऊ कुणी घालायचे? जनतेने… पीएम केअर फंडमध्ये दान कुणी करायचे? जनतेने… दुकानातील नोकरांचे पगार कुणी करायचे? जनतेने… मोलकरीण आणि ड्रायव्हरचे पैसे कुणी कापू नये? जनतेने… भाडेकरूकडून भाडे कुणी घेऊ नये? जनतेने… आणि सगळ्यानंतर शेवटी सरकारने जनतेनेसाठी काय केले? तीन महिन्यांच्या सवलतीच्या नावाखाली खोटा दिलासा… ना बँकेचा इएमआय थांबला… ना वीजेचे बिल थांबले आणि ना शाळेची फीस…शेवटी आम जनतेला काय सूट मिळाली? सरकारकडे याचे काही उत्तर आहे का?.. सरकारचे असे वाभाडे काढणाऱ्या एका महिलेच्या टिकटॉक व्हिडीओने सध्या धुमाकूळ घातला आहे.

व्हिडीओमध्ये सरकारला सवाल करणारी ही महिला नेमकी कोण आहे, हे स्पष्ट झालेले नाही.मात्र तिने उपस्थित केलेले सवाल सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. दिग्विजय सिंह यांनीही या महिलेची ओळख दिलेली नाही. मोदी, शाह आणि मोदी भक्तांकडे याचे उत्तर आहे का? असेल तर उत्तर द्या, असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला आहे. भारतात जानेवारी महिन्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला तेव्हाच परदेशातील भारतीयांना देशात आणून विमान वाहतुकीवर बंदी घालायला हवी होती. परंतु तसे न करता मोदी सरकार गुजरातमधील नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आणि मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यातच व्यस्त राहिले, अशी टिकाही दिग्विजय सिंह यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा