लॉकडाऊन-३ मध्ये काय सुरू आणि काय बंद?

0
1084
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः केंद्रीय गृह मंत्रालयाने ३ मे रोजी संपणाऱ्या देशव्यापी लॉकडाऊनला आणखी दोन आठवडे म्हणजेच १७ मेपर्यंत मुदतवाढ देतानाच या कालावधीत कोणत्या गोष्टींना सूट असेल आणि कोणत्या गोष्टींवर निर्बंध असतील, याची मार्गदर्शक सूचीही जाहीर केली आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांत खालील बाबींचा समावेश आहे.
– लॉकडाऊन-३ च्या काळात सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत अनावश्यक व्यवहारांना परवानगी असणार नाही. या भागात जमावबंदीचे कलम १४४ लागू राहील.
-सर्व झोनमध्ये ६५ वर्षे वयापेक्षा अधिक वयाचे लोक ( ज्यांना आधीपासून दुर्धर आजार आहे), गर्भवती महिला आणि १० वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या मुलांना कुठेही येण्या-जाण्याची परवानगी असणार नाही.
-सर्व रूग्णालयाचे बाह्य रूग्ण विभाग म्हणजेच ओपीडी सुरू रहातील.

हेही वाचाः १७ मेपर्यंत वाढवला देशव्यापी लॉकडाऊन; रेल्वे, विमानसेवाही बंदच!

-रेड झोनमध्ये काही व्यवहारांवर पूर्णतः बंदी असेल. या भागात सायकल, रीक्षा, ऑटो रीक्षा, टॅक्सी, बस, हेअर कटिंग सलून, स्पा वगैरे पूर्णतः बंद असतील.
-विशेष आर्थिक क्षेत्र, निर्यातक्षम यूनिट, औद्योगिक वसाहती आणि इंडस्ट्रियल टाऊनशिपमधील उद्योगधंद्यांना कामकाजाची परवानगी असेल.
-जीवनावश्यक वस्तू, औषधे, त्यांच्याशी संबंधित कच्चा माल यांच्या वाहतुकीला परवानगी असेल.

हेही वाचाः BigBreaking: दारूची दुकाने सुरू होणार, पण एकावेळी दुकानात फक्त ५ जणांनाच परवानगी

-माहिती तंत्रज्ञान, हार्डवेअर, ज्यूट उद्योग, पॅकेजिंग, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात कामकाज करण्याची परवानगी असेल.
– ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था असेल अशाच ठिकाणी बांधकाम क्षेत्राला काम करण्याची सूट अशाच ठिकाणी असेल.
-ग्रामीण भागात मनरेगा, अन्न प्रक्रिया उद्योग, वीटभट्ट्यांवर कामकाज करण्याची सूट देण्यात आली आहे.
-ऑरेंज झोनमध्ये ओला- उबरसारख्या टॅक्सीसेवांना एक चालक आणि एक प्रवासी या अटीवर परवानगी असेल.

हेही वाचाः कोरोनाचे संकटः महाराष्ट्रातील १४ जिल्हे रेड झोनमध्ये, फक्त ६ जिल्हेच ग्रीन झोनमध्ये!

-ऑरेंज झोनमध्ये एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गाड्या जाऊ शकतील.
-ग्रीन झोनमध्ये सर्व प्रकारच्या व्यवहारांना परवानगी असेल. मात्र ज्या व्यवहारांवर संपूर्ण देशभरात निर्बंध असतील, तेच निर्बंध या भागातही लागू असतील.
-ग्रीन झोनमध्ये बसेस अर्ध्या क्षमतेनेच चालतील. बस आगारातही क्षमतेच्या  अर्धेच कर्मचारी कामावर येतील.

-ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ई-कॉमर्सला परवानगी असेल. ग्रीन झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंखेरीज अन्य वस्तूंचीही डिलिव्हरी करता येईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा