अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईच्या नानावटी रूग्णालयात उपचार सुरू

0
189
छायाचित्र@अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर हँडलवरून साभार.

मुंबईः बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे खुद्द अमिताभ बच्चन यांनीच ट्विट करून ही माहिती दिली.

माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूग्णालयाने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. माझे कुटुंबीय आणि कर्मचारी यांचीही चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. हे सर्वजण गेल्या १० दिवसांपासून माझ्या नजीकच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांना चाचणी करून देण्याची मी विनंती केली आहे, असे अमिताभ यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचाः राज्यातील कोरोना बाधित आणि रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतीच, आज आढळले ८ हजार १३९ रूग्ण

दरम्यान राज्यात आज ८ हजार १३९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या २ लाख ४६ हजार ६०० वर पोहोचली आहे.आज २२३ मृत्यूची नोंद झाली आहे.  दुसरीकडे आज ४ हजार ३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के असून आतापर्यत बरे झालेल्यांची संख्या १ लाख ३६ हजार ९८५ झाली आहे. सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा