ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या विमानांना ३१ डिसेंबरपर्यंत बंदी, नव्या विषाणूमुळे निर्णय

0
112
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपयोजना म्हणून भारतानेही पावले उचलण्यास सुरुवात केली असून ब्रिटनहून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये उद्भवलेल्या नव्या विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डयण मंत्रालयाने २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी घातली आहे. ब्रिटनमध्ये फैलावत असलेला नवीन कोरोना विषाणूचा संसर्ग भारतात फैलावू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये नवीन कोरोना विषाणू आढळल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली असून रविवारपासून तेथे कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

हेही वाचाः ब्रिटनमध्ये आढळला पहिल्यापेक्षा ७० टक्के जास्त वेगाने फैलावणारा कोरोना विषाणू, जगभर खळबळ

आणखी वाचाः ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांना प्रजासत्ताक दिनासाठी दिलेले निमंत्रण रद्द कराः चव्हाणांची मागणी

दरम्यान, ब्रिटनमधील परिस्थिती पाहता ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवरही बंदी घालण्याची मागणी चव्हाणांसह अनेक नेत्यांनी केली होती. त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा