कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, सज्ज रहाः अजितदादांचा इशारा

0
349

सोलापूर: सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी सज्ज रहा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिल्या.

उपमुख्यमंत्री पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती आणि कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. मात्र केंद्रीय संस्थांकडून नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आपण काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे अजित पवार म्हणाले.

कोरोना अद्यापही संपलेला नाही ही बाब लक्षात ठेवून शहर आणि जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल सज्ज ठेवावेत. बेडची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता, डॉक्टर संख्या, इतर कर्मचारी यांच्या रिक्त जागा स्थानिकरित्या भरती कराव्यात. अशा सूचना त्यांनी केल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा