कोरोना संकटातही सत्तेची हावः भाजपवाल्यांचे ‘महाराष्ट्रा नीड्स देवेंद्र’ तुणतुणे सुरूच

2
9390
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः संपूर्ण जग कोरोना विषाणुच्या संसर्गाचा सामना करत आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. अशा संकटाच्या वेळी राजकीय मतभेद विसरून राज्य म्हणून एकोप्याने संकटाला सामोरे जाण्याची गरज असताना या राज्यावरील अभूतपूर्व संकटातही भाजपची सत्तेची हाव तोंड वर काढू लागली आहे. भाजपवाले ‘महाराष्ट्रा नीड्स देवेंद्र’ हा हॅशटॅग ट्विटरवर चालवत आहेत. विशेष म्हणजे यात भाजपचे आमदारही सहभागी असल्याचे चित्र असून संकटाच्या काळात तरी तुमचे राजकारण ‘होम क्वारंटाइन’ करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना विषाणुच्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहे. याही स्थितीत भाजपवाल्यांची सत्तेची हाव लपून राहिलेली नसल्याचे चित्र आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजपवाले ट्विटरवर ‘#MaharashtraNeedsDevendra’ हा हॅशटॅग चालवून आपली सत्तालोलुपता जगजाहीर करत आहेत. या हॅशटॅगवर भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी ‘सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे,’ असे ट्विट केले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

‘राजकारण आम्हालाही करता येते. पण आज ती वेळ नाहीय. संकटाच्या काळात तरी तुमचे राजकारण ‘ होम क्वारंटाईन’ करा. तुमचा एवढा ‘ अभ्यास’ व अनुभव असेल तर मतद करायला तुम्हाला अडवले कुणी? असा टोला रोहित पवारांनी भाजपवाल्यांना हाणला आहे.

2 प्रतिक्रिया

  1. जेंव्हा कोल्हापुर व पुणे आणि महाराष्ट्रातील बरेचसे गाव पान्यात होते,तेव्हां राज्य कोनाचे होते.साधे कर्ज व शेतकरी आत्महात्ते बद्दल विचारले तर ,देवेंद्र सा.काय म्हनाले ते विसरलो नाहीआजुन आम्ही शेतकरी……. महा.भाजप वाल्यानों.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा