मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेची आमदारकी

0
2641
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोनाच्या संसर्गामुळे विधान परिषदेच्या निवडणुका घेणे शक्य नसल्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची राज्यपाल नामनिर्देशित सदस्यत्वासाठी करण्याचा महत्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

विधान परिषदेत राज्यपाल नामनिर्देशित सदस्याच्या दोन जागा रिक्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याच्या मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे आता त्यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. घटनात्मक तरतुदींनुसार मुख्यमंत्री ठाकरे यांना सहा महिन्यांच्या आत विधान परिषद किंवा विधान सभा या दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागणार आहे. ही मुदत २७ मे रोजी संपते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा