३१ तारखेला लॉकडाऊन उठेल की नाही, हे सांगता येत नाही म्हणत ठाकरेंनी दिले मुदतवाढीचे संकेत

0
1091
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ३१ तारखेला लॉकडाऊ उठणार की नाही, हे सांगता येत नाही. कोरोनाचा व्हायसर जोरदार वाढत आहोत. काही दिवसांत कोरोना वाढणार आहे. लॉकडाऊन अचानक लावणे योग्य नाही, तसे ते उठवणे शक्य नाही. हळूहळू आपली गाडी पूर्वपदावर आणतो आहोत. हे करताना सावध पावले टाकावी लागवी लागतील. काळजी घ्यावी घ्यावी लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. संवादाच्या प्रारंभीच मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधावांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि घरातून बाहेर न पडता प्रार्थना करा, कोरोनाचे संकट दूर होण्याची दुवाँ मागा, असे आवाहन केले. कोरोनाचे संकट आपण नक्की घालवणार. हे संकट इष्टापती माणून काळजी घ्यावी. राज्यातील लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येईल. उद्योग, शेती, दुकाने उघडत आहोत. लॉकडाऊन दूर ठेवा. हळूहळू परवाना दिला जाईल. गर्दी झाल्यास परवाना रद्द केला जाईल. झुंबड उडणार नाही याची खबरदारी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

या पुढची लढाई अधिक बिकट, रूग्ण वाढणारः मी काल सोनिया आणि इतर नेत्यांशी बोललो. पुढील पंधरा दिवसांत आपल्या देशाचे खरे चित्र समोर येणार आहे. विषाणुचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याचा खरा आकडा समजेल. यापुढची लढाई अधिक बिकट होणार आहे. आपल्याकडे काही केसेस वाढणार आहेत. पण घाबरण्याचे कारण नाही. आपण मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उपलब्ध करत आहोत. रुग्णशय्येची व्यवस्था करत आहोत. बांद्रा कुर्ला, वरळी डोम, गोरेगाव येथील रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. काही ठिकाणी आयसीयूची सोय केली आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

पॅकेजची जाहिरात करायची की घोषणा?: काही जण म्हणतात की तुम्ही पॅकेज का देत नाही. आम्ही सर्व देणार आहोत. यापूर्वी खूप पॅकेज वाटले. त्याने काय झाले? पोकळ घोषणा करणारे आपले सरकार नाही. आज गोरगरिबांना धान्य देण्याची योजना केंद्राने मान्य केले. त्यांचे धन्यवाद. शिवभोजन योजनेत लाखांच्यावरती लाभ मिळतो. पहिल्यांदा अन्न मिळणे, उपचार मिळणे महत्वाचे आहे. सर्वांसाठी या उपायोजना करत आहोत. पॅकेजची जाहिरीत करायची की घोषणा करायची?, असा चिमटाही त्यांनी भाजपला काढला.

तुम्ही केले म्हणून आम्ही राजकारण करणार नाहीः एकूणच काय हा संकटाचा काळ आहे. कोणी राजकारण करू नये. तुम्ही केले म्हणून आम्ही नाही करणार. आमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. तुम्ही काही बोला. महाराष्ट्र सरकार प्रामाणिक काम करत आहोत. माणुसकी मोठा धर्म आहे. घरातून उत्सव साजरा करा. सर्व मदत करताना राजकारण करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. या संकटात राजकारण करणे योग्य नाही. माझ्या संस्कृतीत हे बसत नाही, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख न करता हाणला.

दररोज मागितल्या ८५ रेल्वे, मिळाल्या निम्म्याचः महात्मा ज्योतिबा योजनेत १०० टक्के मोफत उपचार केले जाणार आहे. साडेपाच लाख मजुरांची खाण्याची सोय केली. त्यांना घरी जाण्यासाठी खर्च केला. आता हे संकट वाढल्यानंतर त्यांना घरी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. ४८१ ट्रेन्स राज्याने सोडलेल्या आहेत. प्रवाशी मजुरांची संख्या सहा ते सात लाख इतकी संख्या आहे. राज्यसरकारने ८५ कोटी रुपये दिले आहे. आपण रोज ८० रेल्वेची मागणी करतोय आहोत. आम्ही सोय करायला तयार आहेत. परंतु निम्म्या रेल्वे मिळत आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारचः आगामी काळात शिक्षण, शेतीबाबत निर्णय़ घेतला जाईल. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र शासन तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही काळजी करू नका. शिक्षण, आरोग्य, शेती सह आरोग्य खात्यावर आपण काम करत आहोत. काही ठिकाणी आरोग्य सेवा वाढवण्यावर भर देत आहोत. चाचणी वाढवतो आहोत. विदर्भ, कोकणात चाचणी केंद्र सुरू केले जाईल.

औरंगाबाद, मालेगावची परिस्थिती आटोक्यातः आपण महापालिकेच्यावतीने घरोघरी जावून लक्षण असलेल्या रुग्णावर उपचार करत आहोत. हा विषाणु कोणापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याला रोखण्याची गरज आहे. ग्रामीण भागांनी खूप जिद्दीने काम केले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मालेगाव, औरंगाबाद येथील परिस्थिती आटोक्यात येत आहे.

केंद्राचा अंदाज होता दीडलाखाचा, आहेत ३३ हजारः मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सव्वा ते दीड लाख केसेस होण्याचा केंद्राचा अंदाज होता. प्रत्यक्षात आपल्याकडे आज ३३ हजार ६८६ पॉझिटिव्ही रुग्ण आहे. ४७ हजारात पहिला रुग्ण धरला जातो. पहिला रुग्ण देखील यात पकडला आहे. १३ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. हे आपल्यामुळे शक्य झाले आहे. तुम्ही शिस्त पाळली. काही वेळा मला हुकुमशहा झाल्यासारखे वाटते. परंतु तुम्ही शिस्त पाळल्याने हा आकडा नियंत्रणात आहे, असे ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या रक्तात लढण्याची जिद्द, रक्तदान कराः रुग्णांची आबाळ होऊ नये. परंतु ते होत आहे. याच कारण हे संकट मोठं आहे. एप्रिल-मे रुग्णालयात २५ हजाराच्या आसपास बेड होते. मे अखेरीस १४ हजार बेडस् उपलब्ध असतील. तीन टप्प्यात त्या असतील. काहीजणांना  व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची गरज असते. राज्यभर आपण जी बेडसची सुविधा देत आहोत. त्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवले जात आहे. हे केवळ महाराष्ट्रात केले जात आहे. हा टप्पा ओलांडत असताना रक्ताचा पुरवठा मुबलक प्रमाणत उपलब्ध नाही. आपल्याकडे दहा दिवस पुरेल एवढं रक्त उपलब्ध आहे. आता पुन्हा रक्तदानाची गरज आहे. महाराष्ट्राच्या रक्तात संकटाविरुद्ध लढण्याची जिद्द कशी असते हे दाखवून द्यायचे आहे. ज्यांची रक्तदान करण्याची इच्छा आहे. त्यांनी पुढे यावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा