मुख्यमंत्र्यांनी पाहिले ऑनलाइन वर्गाचे प्रात्यक्षिक!

0
45

मुंबई: शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाइन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आज जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाइन वर्ग भरवता येतो त्याचे प्रात्यक्षिक पाहिले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

येत्या काही दिवसांत शिक्षक आमदार तसेच निवडक मुख्याध्यापक, शिक्षक यांना देखील हे सादरीकरण करून त्यांच्याकडून सूचना मागवाव्यात असेही मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले. शालेय शिक्षण विभागाची व्हिसी आज त्यांनी घेतली त्यावेळी विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या.

अभ्यासक्रम ऑफलाइनही उपलब्ध हवाः पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक अभ्यासक्रम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असल्याने त्याची सर्व उपकरणांवर कॉम्पॅटिबिलिटी असावी. तसेच तो सहजरित्या ऑफलाइनही उपलब्ध झाला पाहिजे, हे पाहण्यास सांगितले. यावेळी त्यांनी गुगल मीटवरील एक ऑनलाईन वर्गाचे प्रात्यक्षिकही त्यांनी पाहिले. विद्यार्थ्यांना कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ देता कामा नये तसेच त्या आल्यास त्यांचे त्वरित निराकरण करणारी यंत्रणा हवी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रायोगिक तत्वावर दोन वाहिन्याः जिओ टीव्हीवर प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. या टीव्हीवर पहिली ते बारावी असे स्वतंत्र ५ वाहिन्यांचे नियोजन आहे. दूरदर्शनकडेही दिवसाला ४ ते ५ तास शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन आहे, असे यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा